विशेष प्रतिनिधी
पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी 41 युद्ध केले आणि एकाही युद्धात पराभव झाला नाही. ते स्वत:साठी नाही तर देश आणि स्वराज्यासाठी लढत होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काढले. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
अमित शहा म्हणाले, थोरले बाजीराव स्वराज्याचे केवळ पंतप्रधान होते. त्यांच्यात इतका पराक्रम आणि एवढी मोठी शक्ती असताना देखील ते पेशवेच राहिले. श्रीमंत बाजीराव पेशवे यांना कोणी, ईश्वरदत्त सेनापती, अजिंक्य योद्धा, श्रीमंत बाजीराव पेशवे असे म्हणतात. त्या वेळी अनेक राजांनी विजय मिळवला होता. मात्र बाजीराव पेशवे ते स्वतःसाठी लढले नाहीत. तर देश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी लढले. त्यांचे प्रत्येक युद्ध हे मातृभूमीसाठी, धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी होते. आपल्या चाळीस वर्षाच्या जीवनात त्यांनी अमर इतिहास लिहिण्याचे काम केले. पुढील अनेक शकते ते कोणीही करू शकणार नाही.
पेशवा बाजीराव यांचे स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीए पुणे अकादमीच असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले, देशातील तिन्ही सेनांचे आगामी काळातील सूत्रधार ज्या ठिकाणी प्रशिक्षित होऊन निघतात. त्या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारणे आणि त्यांच्या या मूर्ती पासून प्रेरणा घेऊन, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्या भविष्यातील सैनिक जाणार असतील तर अनेक वर्षापर्यंत भारतीय सीमा भागाला हात लावण्याचा कोणीही हिंमत होणार नाही. असा मला विश्वास आहे.
आजची युद्धाची परिस्थिती आणि बाजीराव पेशवे यांच्या काळातील युद्धाची पद्धती, यांच्यात काय साम्य असल्याचा प्रश्न विचारला जातो. मात्र, युद्ध कलेच्या पद्धतीत काही कला या कायम असतात. यामध्ये युद्धामधील व्ह्यूव रचना, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, समर्पण, देशभक्तीचा भाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बलिदानाचा भाव. हेच सैनिकांना विजय मिळवून देते. हत्यार बदलत राहतात मात्र, या सर्व गोष्टी कायम राहत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. या सर्वांचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पाचशे वर्षांच्या इतिहासात पाहायचे असेल तर इतिहासाचा विद्यार्थी म्हणून केवळ पेशवे श्रीमंत बाजीराव यांच्यात मिळते. इंग्रजांनी इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, ते यशस्वी झाले नसल्याचे शहा म्हणाले.
Bajirao Peshwa was an invincible warrior, never lost a single battle, Amit Shah praises
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी