Medha Kulkarni : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल; काही दिवस संपर्कात नसणार

Medha Kulkarni : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल; काही दिवस संपर्कात नसणार

Medha Kulkarni

विशेष प्रतिनिधी

पुणे : Medha Kulkarni भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी स्वतः समाज माध्यमांतून दिली. पुढील काही दिवस संपर्कात राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.Medha Kulkarni

मेधा कुलकर्णी यांनी x या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे काही दिवस आपल्या संपर्कात नसेन. त्याबद्दल दिलगीर आहे.काही काम असल्यास आपण माझ्या कार्यालयाशी संपर्क करू शकता. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू.Medha Kulkarni



काही दिवसांपूर्वी शनिवारवाडा नमाज प्रकरणात मेधा कुलकर्णी वादात सापडल्या होत्या. शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण केल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी व पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा परिसरात शिववंदना घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या परिसरात गोमूत्रही शिंपडले. यावेळी त्यांचा पोलिसांशी वादही झाला. ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आला, त्या जागी जाऊन आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. पण पोलिसांनी त्यांना शनिवारवाड्यात जाण्यास मनाई केली होती.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपने खासदार मेधा कुलकर्णी यांना आवरावे. शनिवारवाडा ही वास्तू कुणाच्याही बापाची नाही. शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य व पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जातीधर्माचे आहेत. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी यांनी येथील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये. त्या जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. आपण खासदार असल्याचा विसर त्यांना पडला आहे, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले होते.

BJP MP Medha Kulkarni admitted to hospital; will be out of contact for a few days

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023