विशेष प्रतिनिधी
बारामती: मी चांगले काम करेल, का 85 वर्षांचा माणूस? असा सवाल करत अजित पवार यांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उचलला. त्यांचा रोख माळेगांव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्यावर असला तरी त्यांनी यातून जेष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावरही निशाणा साधला. Ajit Pawar
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले, माझे बापजादा आणि चुलत्याच्या पुण्याईने चांगले चालले आहे, जर बारामतीचा चेअरमन मीच असेल, तर साखर आयुक्त किंवा सहकार मंत्री काय करेल? मी चेअरमन झालो तर कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावेन. संचालक चुकला तर मी आहे, मला काय करायचे ते मी करेन. अजित पवारला पैशाची गरज नाही,
अजित पवार म्हणाले, मी शब्द फिरवला तर मला विधानसभेला जाब विचारा. मी सोमेश्वर कारखाना बाहेर काढला नाही तर फॉर्म भरणार नाही असे सांगितले होते आणि मी तो बाहेर काढला, मगच फॉर्म भरला. तसेच, मी पाच वर्षे भत्ता पण घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
माळेगाव नगरपंचायतीसाठी गेल्या चार वर्षांत 350 कोटी रुपये दिल्याचे सांगून अजित पवार म्हणाले , “एक्साईज डिपार्टमेंट कोण? अजित पवारच आहे, त्याच्याच हातात आहे. त्याला विनंती करू, अरे सगळे आपल्या हातात आहे. सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला अजित पवारची मान खाली घालायची की ताठ ठेवायची तुमच्या हातात आहे.माझी इच्छा होती छत्रपती कारखान्याचे चेअरमन व्हायची. आता 5 वर्षे अजित पवार चेअरमन असणार आहे. जर सासुरवाडीला जाऊन कारखाना चालवतो, तर माझे मला जमत नाही का? हे तर माझे बाळ आहे. ते म्हणतात ब वर्गातील एक जागा त्यांची येईल. बाकी आमच्या येतील. अरे आम्ही गोट्या खेळायला आलोय का?
मी कोणासमोर सहसा हात जोडत नाही. पण तुमच्या समोर हात जोडतोय, कारण तुम्ही मतदार आहात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी कामाचा माणूस आहे. मी स्वार्थी नाही, मी मतलबी नाही. जेवढे मला भरभरून देता येईल त्यासाठी मी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. अजित पवार चेअरमन होण्यासाठी हे बोर्ड आले पाहिजे, माझ्यासाठी मतभेद बाजूला ठेवा,” असेही अजित पवार म्हणाले.
Chandrarao Taware and Ajit Pawar’s target on Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी