विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune पुण्याच्या सर्वात गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या अलका चौकात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.Pune
लक्ष्मी रोड, बाजीराव रोड आणि टिळक रोड परिसरात गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. याच गर्दीतून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडला. शिवमुद्रा वाद्यपथक वादन करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी केली, त्यानंतर हा वाद थांबला.Pune
दरम्यान, पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन फसले. अनेक गणेश मंडळानी डीजे सुरूच ठेवण्याचा हट्ट धरल्याने मिरवणूक अद्यापही सुरू आहे.
काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा डीजे सुरु करुन विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरु केली .
पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला २४ तासापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूका सुरु आहेत. काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली होती. पाच मानाच्या गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळली.
मानाचा पहिला कसबा गणपती3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे 4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाचे 4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.
मात्र त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इतर मंडळे घुसखोरी करत असल्याचा आरोप करत मिरवणूक थांबविली होती. त्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला होता.
Clashes, violent clashes erupt between two groups during immersion procession
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा