विशेष प्रतिनिधी
पुणे : Rupali Chakankar वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून संगीता भालेराव या महिलेने थेट राज्य महिला आयोगातच रूपाली चाकणकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. चाकणकरांकडून आपल्याला जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.Rupali Chakankar
दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांच्या समर्थक महिलेने संगीता भालेराव यांना फोन करुन धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही ही क्लिप सोशल मीडियावर शेअर करत रूपाली चाकणकरांवर निशाणा साधला होता. आता संगीता भालेराव यांनी या प्रकरणी रूपाली चाकणकरांविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.
मी चार-पाच दिवसांपूर्वी फेसबुकवर महिला आयोगाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे, अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. त्यामुळे रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी सोनाली गाडे यांनी चिडून पदाची धमकी देत मला अनेक फोन केले. त्यातील एक फोन मी उचलला असता तिने धमकी व शिवीगाळ केली, असा आरोप संगीता भालेराव यांनी केला. मी कोणत्याही पोस्टमध्ये अथवा कमेंटमध्ये चुकीचा मजकूर लिहिलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला आयोगाचे काम सुधारावे ही मागणी करणे हा माझा संवैधानिक हक्क आहे व त्याबाबतच मी बोललेले होते, असे भालेराव यांनी म्हटले.
सोनाली अजित गाडे यांच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सोनाली गाडे व हे ज्यांच्यासाठी मला धमकी दिली, त्या रूपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे माझी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार आहे, असे संगीता भालेराव यांनी म्हटले आहे. सोनाली गाडे यांच्यासोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील इ-मेलसोबत जोडल्याचे सांगितले आहे.
मी महिला म्हणून तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने वैष्णवी हगवणे-कस्पटेसारख्या घटना मनाला हेलावून टाकतात व त्या संवेदनशीलतेमधून मागणी करणे तसेच त्याबाबत विचारणा करणे हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी देखील तेवढेच केले होते, तरीही माझ्या अभिव्यक्तीची गळचेपी सोनाली गाडे या व्यक्तीने करण्याचा प्रयत्न केला आहे. मला धमकावून ती पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केले, तसेच अन्य ठिकाणी सोशल मिडीयावर मला असभ्य शब्द वापरले धमकी देत शिवीगाळही केली.
महिलांसाठी सर्वात वाईट समजला जाणारा शब्द म्हणजे वांझोटी अशा शब्दांसारखे अनेक क्रूरता स्पष्ट करणारे व महिला म्हणून मला लज्जा उत्पन्न करणारे अपमानित करणारे शब्दप्रयोग त्यांनी केले असल्याने मला मानसिक त्रास झाला आहे. तसेच हे सगळे त्यांनी सोशल मीडियामध्ये केले असल्याने माझी बदनामी देखील झाली आहे. त्या एका राजकीय सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आहेत व त्यांच्या पदाचा त्या गैरवापर करू शकतात असे त्यांनी खुद्द धमकी देत बोलून दाखवले आहे.
तसेच, त्यांनी 8379955110 या नंबरवरून मला 18 कॉल केलेले असल्याने त्यांच्या डोक्यात किती चीड असेल याचा अंदाज येईल. त्यासोबतच सोनाली अजित गाडे यांच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सोनाली गाडे व हे ज्यांच्यासाठी केले, त्या रूपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे, माझी रूपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार आहे. असे संगीता भालेराव यांनी महिला आयोगाला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Complaint against Chairperson Rupali Chakankar in Women Commission
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं




















