विशेष प्रतिनिधी
Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी पाच जणांना अटक केली आहे. या पाच जणांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) व त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना फरार राहण्यासाठी मदत केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रितम पाटील याचाही समावेश आहे.
मोहन उर्फ बंदू उत्तम भेगडे (वय 60, रा. वडगाव मावळ), बंदू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), प्रितम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. प्रितम पाटील हा कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. वीरकुमार पाटील यांनी सलग 28 वर्षे आमदार राहिले असून, आपल्या कार्यकाळात ते ऊर्जा मंत्री देखील होते.
वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या अत्याचार व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी सुरुवातीलाच अटक केली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघेही 17 मेपासून फरार होते. 22 मे रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे अटक टाळण्यासाठी 17 मे ते 22 मे या पाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. या काळात त्यांना आश्रय व मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून पलायन केलेल्या या दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास या आरोपींनी मदत केली होती.
मोहन भेगडे हा हगवणेंचा मित्र आहे. मोहन बंडू फाटक हा पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक आहे. अमोल जाधव आणि राहुल जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा दिला होता. प्रितम वीरकुमार पाटील याने कर्नाटकातील कोगनोळी या ठिकाणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिला होता. Rajendra Hagawane
Five people arrested for sheltering Rajendra Hagawane including son of former Karnataka minister
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं