विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे (वय 86 ) यांचे आज निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. Krishnarao Bhegde
कृष्णराव भेगडे यांचा राजकीय प्रवास 1970 च्या दशकात सुरू झाला. त्यांनी भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि नंतर जनता पार्टी, काँग्रेस, व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काम केले. दोन वेळा मावळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या भेगडे यांनी स्थानिक पातळीवर विकास कामांना गती दिली. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख शिक्षणाच्या माध्यमातून झाली. त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मावळ परिसरात विविध शाळा, महाविद्यालये सुरू केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, महिला शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये, तसेच तंत्रशिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे यांचा समावेश होता.
ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य, शेती, सहकार आणि सामाजिक न्याय क्षेत्रातही काम केले. त्यांनी मावळमधील अनेक गावांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. शेतकरी संघटनांमध्ये सक्रिय राहून त्यांनी शेतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव व्यापक होता, त्यांनी पतसंस्था, सहकारी बँका आणि दूध संघांच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीची दिशा दाखवली.
राजकीयदृष्ट्या ते स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून ओळखले जात. सत्ता मिळवण्यासाठी कधीही खालच्या पातळीवर गेले नाहीत, नीतिमत्ता हीच त्यांची खरी ताकद होती. अनेक पक्षांमध्ये प्रवास करूनसुद्धा त्यांच्या प्रतिमेला कोणतीही धक्का लागली नाही. विधानसभेतील त्यांचे प्रश्न मांडण्याचे कौशल्य, मुद्देसूद भाषण, आणि विरोधकांनाही विचार करायला भाग पाडणारी शैली सर्वांनाच भावत असे.
Former Maval MLA Krishnarao Bhegde passes away
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी