विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Gang War : पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून टोळीयुद्धाच्या छायेत आहे. गुन्हेगारी विश्वात आपली हुकमत गाजवणारी आंदेकर टोळी ही यातील एक प्रमुख नाव आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या नेतृत्वाखाली ही टोळी पुण्यातील अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होती. प्रतिस्पर्धी टोळ्यांशी सतत होणारे संघर्ष, खून आणि बदल्याची आग यामुळे आंदेकर टोळी कायम चर्चेत राहिली आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजी वनराज आंदेकर यांच्या खुनाने पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. या खुनानंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याचा विडा उचलला आणि त्यातूनच पुण्यात पुन्हा एकदा रक्तरंजित कारस्थान उघडकीस आले आहे.
वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने प्रतिस्पर्धी टोळीच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याचा कट रचला होता. याच कटाचा भाग म्हणून दत्ता काळे नावाचा व्यक्ती आंबेगाव पठार येथील एका आरोपीच्या घराची रेकी करत होता. मात्र, स्थानिक तरुणांनी संशयावरून त्याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. दत्ता काळेच्या मोबाइलमधील फोटोंमुळे पोलिसांना या कटाची माहिती मिळाली आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली.
या तपासादरम्यान पोलिसांना आंदेकर टोळीच्या कटाचा आणखी एक धागा सापडला. वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपींच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर यांच्या घराकडे आपले लक्ष वळवले. याचाच परिणाम म्हणून गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. पोलिसांना संशय आहे की, अमन पठाण आणि यश पाटील यांनी हा खून केला आहे. सध्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.
शस्त्रपुरवठ्याचा कट उघडकीस
तपासादरम्यान गुन्हे शाखेने टिपू पठाण टोळीतील तालीम आस मोहम्मद खान आणि युनुस जलील खान या दोघांना ताब्यात घेतले. तालीम पठाण हा गुन्हेगारांना शस्त्रे पुरवण्याचे काम करतो, असा पोलिसांचा संशय आहे. आंदेकर टोळीला शस्त्रे पुरवण्यात त्याचाच हात असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. याच कटाचा भाग म्हणून कृष्णा आंदेकरने दत्ता काळेला पाच शस्त्रांसह अमन पठाण येणार असल्याची माहिती दिली होती. सध्या कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, यश मोहिते, अमित पाटोळे आणि स्वराज वाडेकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.
गणेश विसर्जनामुळे तपासाला खीळ
सध्या पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका जोरात सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांचे सगळे लक्ष या मिरवणुका सुरक्षित आणि निविघ्नपणे पार पाडण्याकडे आहे. यामुळे आयुष कोमकर खून प्रकरणाच्या तपासाला काहीसा विलंब होत आहे. विसर्जन मिरवणुका संपल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
पुण्यात गँगवॉर पुन्हा भडकणार?
वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर आंदेकर टोळीच्या बदल्याच्या कारवायांनी पुण्यातील गँगवॉरची ठिणगी पुन्हा पेटली आहे. एका बाजूला शस्त्रपुरवठ्याचा कट, तर दुसऱ्या बाजूला रक्तरंजित खून, यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रश्न हा आहे की, ही घटना पुण्यातील गँगवॉर पुन्हा भडकण्याचे संकेत आहे का?
Has the spark of gang war been ignited again? Bloody revenge for the Vanraj Andekar murder case!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा