विशेष प्रतिनिधी
पुणे: Laxman Hake ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय. आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत, अशी भावनिक पोस्ट ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.Laxman Hake
राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत जीआर काढला आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देऊ नये, अशी ओबीसी समाजाची मागणी कायम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मेळावा आणि दौऱ्यांमधून ओबीसींना एकत्र करण्याचं काम करत आहेत. याचपार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्यानांदूर येथे शनिवारी ओबीसी मेळावा होणार आहे. मात्र या मेळाव्याआधी लक्ष्मण हाके यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.Laxman Hake
लक्ष्मण हाके यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले की, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय. आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे. मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली. उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असो किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि मला पाठिंबा देत राहिलात. त्याबद्दल मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.
I am fighting honestly so that OBCs and nomads should come together, Laxman Hake’s emotional post
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!