विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘चरणसेवा’ उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत 1 लाख 43 हजार वारकऱ्यांना थेट सेवा मिळाली असून, 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृती पोहोचली आहे.
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या संकल्पनेतून पालखी मार्गावरील 116 विश्रांती व मुक्कामाच्या ठिकाणी तर, पालखी मार्गावरील 221 आपला दवाखान्यांमधून चरणसेवा व आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत. या उपक्रमात 219 आरोग्य संस्थांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या पायांची मालिश करण्यासाठी 2 हजार लिटर आयुर्वेदिक तेलाचे उत्पादन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती देण्यासाठी 10 ‘आरोग्य जनजागृती रथ’ पालखी मार्गावर तैनात करण्यात आले आहेत. या रथाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मदतीचे स्वरूप, योजनांची माहिती आणि आरोग्य सेवांचा प्रसार केला जात आहे.
या उपक्रमात राज्यभरातील 9 हजार 475 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पॅरामेडिकल विद्यार्थी, नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. याशिवाय, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, बीड, आणि धाराशिव या सात जिल्ह्यांचा सक्रीय सहभाग लाभलेला आहे. तर, वारकऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सात ठिकाणी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसोबत आरोग्याचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम आदर्श ठरत आहे. तसेच पालखी मार्गावर रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून चरणसेवा उपक्रम सुरू आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या वारकरी यांच्यासोबतच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे. चरणसेवेसोबत केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांची माहिती आरोग्य जनजागृती रथाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
Lakhs of Warkaris benefited from the ‘Charanseva’ initiative conceived by the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी