विशेष प्रतिनिधी
पुणे : Hagwane राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबियांच्या वकीलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बाेट ठेवले आहे. यावरून संताप व्यक् केला जात आहे.Hagwane
वैष्णवीचा नवरा शशांक, त्याची आई लता आणि नणंद करिश्मा यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे, सासरे राजेंद्र आणि सुशील या दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आज सुनावणीवेळी हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आले.हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईड करण्याची होती. तर तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट समोर आले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदराचे औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे समोरून नकार दिला असेल म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली असेल.
वैष्णवीचे बाळ ज्याच्याकडे होते, त्या निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. कारण, निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला आहे. मात्र त्यानेच हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही, त्यामुळे तो दोषी असेल तर त्याला फाशी द्यावी. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे, असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
कस्पटे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, आरोपींनी हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोने गहाण ठेवले आहे, त्याची माहिती घ्यायची आहे. तसेच आरोपींनी वैष्णवीला मारहाण करण्याासठी वापरलेली हत्यारे आणि रॉड हस्तगत करायची आहेत. त्यामुळे, आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांकडून आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी म्हटले की, हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. असे असताना ते लोकं 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी वैष्णवीचा छळ कशाला करतील. तसेच नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही. वैष्णवीला प्लॅस्टिकच्या छडीनं मारलं असेल तर त्याला हत्यार म्हणायचं का? असा प्रश्नही हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
Lawyers of the Hagwane family discussed Vaishnavi’s character
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं