महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट, प्रभागनिहाय मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल

महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट, प्रभागनिहाय मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल

municipal elections

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला होता. municipal elections

त्यामध्ये ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करावी, त्यानंतर त्यावर हरकती सूचना मागविणे, योग्य हरकतींची दखल घेऊन मतदार यादी मध्ये बदल करणे, त्यानंतर मतदार केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर केलेला होता. यामध्ये १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती. मात्र या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गुरुवारी (दि. ६) प्रारूप मतदारयादी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या मतदार याद्या नागरिकांसाठी ऑनलाइन खुल्या राहतील असेही जाहीर केले होते. परंतु यासाठी इच्छुक उमेदवारांना वाट पाहावी लागणार आहे. या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्याने यात १२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, मतदारयादीच्या विभाजनात प्रभाग रचनेप्रमाणेच मतदार याद्यांची तोडफोड झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर, महापालिकेकडून या याद्यांची पुन्हा छाननी करण्यात आली असून, त्याची तपासणी केली जाईल. असे महापालिकेच्या निवडणुक विभागाने सांगितले होते. या तक्रारीनंतर मुकादम व अन्य कर्मचाऱ्यांचे लॉगइन काढून घेण्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना मुदत दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, मतदारयादीबाबत झालेले आरोप आणि महापालिकेने केलेला दावा यातील नेमके तथ्य या याद्या जाहीर झाल्यानंतरच समोर येणार आहे.

महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. ही रचना २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येवर आधारित असून, १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार नोंदणी वैध धरली आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसह शिरूर, पुरंदर आणि भोर-वेल्हा या विधानसभा मतदारसंघांतील शहरी भागातील मतदारांचाही समावेश या निवडणुकीत करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी पुणे महापालिकेला यादी सुपूर्त केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप यादी जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. मागील २० दिवसांपासून १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत हे काम सुरू हे काम संपले असून, त्यानंतर आता स्वतंत्रपणे या याद्यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागातील लोकसंख्या लाखाच्या आत ठेवण्यात आली होती. मात्र, जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार नोंदणीमुळे सध्याच्या मतदारसंख्या बहुतेक प्रभागांमध्ये लाखाच्या वर गेली आहे. काही प्रभागांतील मतदारसंख्या पावणेदोन लाखांवर पोहोचली आहे. परिणामी अनेक इचछुकांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

असा आहे मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम

– प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना मागविण्यासाठी यादी प्रसिद्ध करणे : १४ नोव्हेंबर २०२५

– प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : २२ नोव्हेंबर २०२५

– हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : ६ डिसेंबर २०२५

– मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान यादी जाहीर करणे : ८ डिसेंबर २०२५

– मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५

Major update regarding municipal elections, change in ward-wise voter list schedule

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023