Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागु करणाऱ्या जीआर विरुद्ध याचिकांवर आमचे म्हणणेही ऐकून घ्या, मराठा समाजातर्फे उच्च न्यायालयात कॅवेट दाखल

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागु करणाऱ्या जीआर विरुद्ध याचिकांवर आमचे म्हणणेही ऐकून घ्या, मराठा समाजातर्फे उच्च न्यायालयात कॅवेट दाखल

Hyderabad Gazette

विशेष प्रतिनिधी

पुणे : Hyderabad Gazette मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद चालू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र याबद्दल ओबीसी संघटनांमध्ये नाराजी आहे या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच इतर संघटनांनी केली आहे या याचिकांवर सुनावणी करताना आमचे म्हणणे ऐकून घ्या यासाठी मराठा समाजातर्फे उच्च न्यायालयात कॅवेट दाखल करण्यात आले आहे. Hyderabad Gazette



मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी वकील गणेश म्हस्के पाटील आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रशांत भोसले यांच्या वतीने ॲड. अतुल रामेश्वर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात कॅवेट दाखल केल्या आहेत. Hyderabad Gazette

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी हैदराबाद गॅझेट लागु करावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तमाम मराठा समाजाकडुन करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी एक सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल असे समजल्याने हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भविष्यात या शासन निर्णयाविरुद्ध दाखल होणाऱ्या याचिका मधे आमचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे व कोणताही एकतर्फी आदेश पारीत करण्यात येऊ नयेत अशी विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. Hyderabad Gazette

Maratha Community Files Caveat in High Court Against Petitions Challenging Hyderabad Gazette GR, Urges Hearing of Their Stand

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023