विशेष प्रतिनिधी
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागातील सेवाशर्ती, भरती प्रक्रिया व कामकाजाच्या अडचणींबाबत ठोस उपाययोजनां वर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’तर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर मिसाळ यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे मिसाळ यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळाशी मिसाळ यांनी सकारात्मक चर्चा केली.
रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, वेतनश्रेणी, पदोन्नती व सेवाशर्ती सुधाराव्यात, इन्क्रिमेंट व विविध भत्त्यांचे पुर्नविचार करावा, सेवेत असलेल्या परिचारिकांचे स्थायिकरण व कार्यकालीन धोरणात स्पष्टता आणावी, केंद्राच्या गाईडलाइननुसार परिचारिकांचे कामकाज, भरती व प्रशिक्षण सुधारावे आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
मिसाळ यांनी भरती प्रक्रियेबाबतही स्पष्टता दिली. मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या. यामध्ये वेबसाईटवर पेमेंट लोड न होणे, कागदपत्रे अपूर्ण असणे, व काही विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षांचे निकाल अद्याप न लागणे अशा तांत्रिक कारणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, १४ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे, असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.
Meeting with Chief Minister for nurses’ demands, information from Minister of State for Medical Education Madhuri Misal
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी