पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे अर्थव्यवस्थेला गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे अर्थव्यवस्थेला गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक मुळे पुणे, मुंबई आणि एमएमआर रिजन  या भागात नवीन इकाॅनाॅिमक काॅरीडाॅर तयार करु शकणार आहाेत. या भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवाल आणि काेराेना काळातील अनुभवावर आधारीत ‘प्रथम माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे आदी नेते उपस्थित हाेते.

नवी मुंबईतील विमानतळ आणि पुणे ते मुंबई महामार्गावर घाट भागातील मिसींग लिंकची पाहणी केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही मिसींग लिंक म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अद्वितीय नमुना आहे. देशातील सर्वांत  नऊ किलाेमीटर लांबीचा आणि रुंदींचा तसेच  १८५ मीटर उंच केबल स्ट्रेट ब्रीज असलेली ही मिसींग लिंक आहे.  ९४ टक्के काम पुर्ण झाले असुन, नाेव्हेंबर – डिसेंबर हा मार्ग सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

या बाेगद्यामुळे खंडाळा घाटातील मार्ग टाळून पुणे – मुंबईला जाता येणार आहे. यामुळे सहा किलाे मीटरचे अंतर आणि अर्धा तासाचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पुण्यातून नवी मुंबई विमानतळावर सव्वा तासात पाेहचता येणार आहे. या मिसींग लिंकमुळे मुंबई, पुणे आणि एमएमआरडीए या भागात आपण नवीन इकाेनाॅमिक कारीडाॅर तयार करू शकणार आहाेत, यामुळे या भागातील अर्थ व्यवस्थेला गती मिळेल’’ असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

युनेस्कोने महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक किल्ला जागतिक वारसा म्हणून जाहीर केल्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, ‘‘स्थापत्यशैलीमुळे हे किल्ले हे जागतिक वारसा झाले आहे. त्यामुळे शिवरायांचा , मराठा साम्राज्याचा इतिहास हा जागतिक झाला आहे. इतिहास आता जगापुढे येईल. त्यामुळे  पर्यटक, अभ्यासकांच्या दृष्टीने हे  किल्ले आकर्षणाचे केंद्र झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज झाले, त्याची प्रोसेस चालली होती, अनेक संवाद भेटीगाठी सुरू होत्या, २० देशांनी मतदान केले. त्यात अनेक निकष होते त्यात महत्वाचा होता तो स्थापत्य कलेचा नमुना आहे. माची पद्धत वेगळे पण जाणवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता जागतिक झाला आहे, या किल्याची माहिती युनेस्को देणार आहे, हे सगळ्याकरता आकर्षित झाले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुरलीधर मोहोळ यांची कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले,

मोहोळ स्वतः पहिलवान आहेत. सगळ्या क्षमतेने पहिलवान लढत असतो. मोहोळ लढत आहेत, कोविड काळात त्यांनी केलेले काम अप्रतिम आहे. कोविड काळात अनेक नेते घरी बसून होते, काम करत नव्हते, त्यावेळी मोहोळ काम करत होते. चांगल्या काळात कोणीही नेतृत्व करतो. पण संकटात खरे नेतृत्व समजते. त्यामुळे कोविड काळात त्यांचे नेतृत्व तयार झाले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सोबत काम करणे म्हणजे शिस्त असते, पद उपभोगत येत नाही तर जबाबदारी असते, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहा यांनी माझ्याकडे मोहोळ याचे कौतुक केले. मोहोळ चांगले काम करत आहेत. मोदी शहा कोणाचे कौतुक करत नाहीत. यामुळे तुमची ट्रेन पटरीवर चालली आहे. असेही त्यांनी मोहोळ यांना सांगितले.

एक वर्षात काय काम केलं त्याचा अहवाल सादर करण्याची भाजप पक्षाची परंपरा आहे. जनसंपर्क कार्यालया २४ तास नागरिकांच्या समस्या समजून घेता येणार आहेत. लोकांच्या अपेक्षा आहेत, त्यांचे प्रश्न सोडवले जातील. यात अनेक सुविधा देणार आहोत. अनेक योजनाबाबत माहिती, मदत केंद्र असेल, वैद्यकीय कक्ष सुरू असेल. सहा मतदारसंघात जनता दरबार पुण्यात सुरू आहे. असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

कोविड सारखा काळ आता आठवयाला नको वाटते. त्यातील चांगले वाईट अनुभव एका पुस्तकात केलं त्याचे प्रकाशन आज करत आहे. भाजप कार्यकर्ता शहराचा खासदार होतो. कसा मंत्री झालो तुम्हाला काय मलाच कळले नाही. अमित शहा कडक हेड मास्टर मिळाले, तसे फडणवीस सौम्य आहेत. असेही ते म्हणाले.

Missing link on Pune-Mumbai highway will boost economy, believes Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023