विशेष प्रतिनिधी
Pune News : पुणे व मुंबईत मान्सून दाखल झाला असून पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD) पुणेचे शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांच्या माहितीप्रमाणे, काल तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून आज मुंबईत देखील मान्सून पोहोचला आहे. पुणे व सोलापूरमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे, आणि त्यानंतर मुंबईत ही जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत पुढील ४ दिवस भारी पाऊस होणार असून यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याला देखील पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, तर पुणे शहराला येलो अलर्ट दिला गेला आहे.
एस.डी.सानप यांनी सांगितले की, यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे. ८ जूनला मान्सून सामान्यतः येतो, मात्र यंदा तो खूप लवकर, म्हणजे ८ दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला होता. बारामतीमध्ये १३० मिली पाऊस झाल्याची नोंद आहे, ज्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता वाढली आहे.
पुढील ५ दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सर्व आवश्यक तयारी करण्याचे सूचनाही केली आहे.
बारामती व इंदापूरमध्ये पुढील २ दिवस पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या गाईडलाईन्सचा सखोल विचार करून नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
Monsoon arrives in Pune and Mumbai, heavy rains forecast for next 4 days
महत्वाच्या बातम्या