विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यात आपलं वजन कमी झाल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी भर कार्यक्रमात बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. ते पिंपरी दुमाला गावात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत करताना लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पिंपरी दुमाला या गावातून कमी मतदान झालं. तसेच विधानसभा निवडणुकीत आपल्याला गावातून कमी मतदान झालं, अशी देखील खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
वळसे पाटील म्हणाले, “या वेळेला काय झालं ते माझं मलाच कळलं नाही. म्हणजे जास्त नाही, पण माझं राज्यात थोडं वजन कमी झालं. तुम्ही सांगितलं तसं विकासकामांसाठी पैसे दिले. मला तुम्ही जसं निवडून दिलं तसं अमोल कोल्हे यांनाही निवडून दिलं होतं. अमोल कोल्हे यांनी एक रुपयाचंही काम केलं नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या गावामधून आढळराव पाटील यांच्यापेक्षा 291 जास्त मते दिली. ज्यांनी काम नाही केलं त्याला तुम्ही पाठिंबा दिला. आढळराव काम करत होते. तुमच्यात येत होते. बसत होते. त्यांचा पराभव झाला.
“माझा हात मोडला आणि मला लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारात बाहेर येता आलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीतही जेवढं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. याचाच फायदा ज्यांना आम्ही 10 वर्षे कारखान्याचं चेअरमन केलं, 8 वर्षे मार्केट कमिटीचं सभापती केलं. मान, सन्मान दिला. आता अपेक्षा असणं हे स्वभाविक आहे. पण त्या काळात देश, राज्यस्तरावरचं बदलेलं राजकारण त्याचा फटका बसला. मला पिंपरी दुमला गावाने 42 मतांनी मागे ठेवलं. ठिक आहे. मी नाराज झालो नाही”, असं वळसे पाटील म्हणाले.
“My Influence in the State Has Reduced,” NCP Senior Leader Dilip Walse Patil Admits
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















