विशेष प्रतिनिधी
पुणे : Pimpri Builder निवासी प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) एका खाजगी विकासकाला पर्यावरणीय नुकसान भरपाईसाठी तब्बल २.५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Pimpri Builder
२०१६ मध्ये शहरातील रहिवासी तानाजी गंभीरे आणि तुषार काकडे यांनी या प्रकल्पसंदर्भात तक्रार दाखल केली होती. सदर रहिवाशांनी असा आरोप केला होता की, या बांधकाम व्यावसायिकाने मुळशी तालुक्यात आवश्यक त्या परवानग्या न घेताच अनेक इमारती बेकायदेशीरपणे उभारल्या आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारींनंतर, न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील एनजीटीच्या पश्चिम खंडपीठाने ३ सप्टेंबर रोजी संबंधित विकासकाला २.५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
न्यायाधिकरणाच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पात दोन भूखंडांमध्ये ५०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले गेले होते, ज्यामध्ये आठ निवासी टॉवर, दोन व्यावसायिक ब्लॉक, पार्किंग स्ट्रक्चर्स आणि क्लबहाऊस यांचा समावेश होता. एका भूखंडावर २०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम झाले होते, ज्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (EIA) अधिसूचना, २००६ अंतर्गत कायदेशीररित्या पर्यावरणीय मंजुरी घेणे आवश्यक होते. Pimpri Builder
तथापि, यासंदर्भात विकासकाने कधीही अर्ज देखील दाखल केला नव्हता. पर्यावरणीय सुरक्षा उपायांचे पालन न केल्याने पर्यावरणीय संतुलन बिघडले आणि शहरी विकासासाठी एक हानिकारक वातावरण निर्माण झाले, असा निकाल न्यायाधिकरणाने दिला. “प्रदूषक पैसे देतो” या तत्त्वाखाली विकासकाला जबाबदार धरत, खंडपीठाने एकूण २.५५ कोटींची भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करायची आहे.
पुण्यात या प्रकारच्या प्रकरणात एकाच आठवड्यात झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. २९ ऑगस्ट रोजी, कात्रज-कोंढवा रोडवर काम करणाऱ्या आणखी एका विकासकाला देखील अशाच प्रकारच्या उल्लंघनांसाठी १.७ कोटी रुपये इतका दंड आकरण्यात आला होता. Pimpri Builder
Environmental damage; Pimpri Builder fined Rs 2 crore 55 lakh!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा