विशेष प्रतिनिधी
पुणे : PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीवर तब्बल ₹५५ कोटींचा दंड ठोठावला आहे. वारंवार होणारे ई-बस ब्रेकडाऊन आणि निकृष्ट दर्जाच्या बॅटरीमुळे नागरिकांना होत असलेली प्रचंड गैरसोय यामुळे हे पाऊल उचलले आहे. PMPML
पीएमपीएमएल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अवघ्या ४५ दिवसांत ४५ ई-बस बॅटरीसंबंधित तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्या. त्यामुळे अनेक नियोजित फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आणि पुण्यातील आधीच ताणलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक दबाव आला. PMPML
सध्या २५ ई-बसच्या बॅटरी पूर्णपणे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या बदलाचा संपूर्ण खर्च ओलेक्ट्रा कंपनीला करारातील अटींनुसार स्वतःच उचलावा लागेल. पीएमपीएमएलच्या मते, हा करारातील गुणवत्ता निकषांचा थेट भंग आहे. PMPML
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरेंनी सांगितले, “निकृष्ट बॅटरीमुळे वारंवार बस ठप्प होणे हे प्रवाशांवरील अन्याय आहे. म्हणूनच आम्हाला कठोर पाऊल उचलावे लागले. करारानुसार दोषपूर्ण बॅटरी तात्काळ बदलणे ही कंपनीची जबाबदारी आहे. अन्यथा भविष्यात काळ्या यादीत टाकण्याचाही विचार केला जाईल.”
पुण्यात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-बस प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या बिघाडामुळे नागरिकांचा ई-मोबिलिटीवरील विश्वास कमी होऊ शकतो. पुन्हा खाजगी वाहनांकडे वळण्याचा धोका आहे. PMPML
PMPML slaps Olectra with a fine of ₹55 crore for defective e-buses
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा