Ayush Komkar murder case बंडू आंदेकर टोळीवर मोक्का, आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पोलिसांची कारवाई

Ayush Komkar murder case बंडू आंदेकर टोळीवर मोक्का, आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पोलिसांची कारवाई

Ayush Komkar murder case

विशेष प्रतिनिधी

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कुख्यात बंडू आंदेकर टोळीने आयुष कोमकर या अवघ्या 19 वर्षांच्या मुलाचा खून केला. त्याच्यावर तब्बल 11 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. Ayush Komkar murder case

सुर्यकांत ऊर्फ बंडु आण्णा रानोजी आंदेकर (वय ७०), यश सिध्देश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), तुषार निलंजय वाडेकर (वय २७), स्वराज निलंजय वाडेकर (वय २३), वृंदावणी निलंजय वाडेकर (वय ४०), अमन युसुफ पठाण ऊर्फ खान (वय २५), सुजल राहुल मेरगु (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत.

आयुष कोमकर हत्येप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता. कलम-१०३(१), ६१(२),३(५), आर्म ऑक्ट-३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम – ३७ (१), सह १३५, क्रि. लॉ. अमेडमेन्ट कलम-०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींनी 5 ऑगस्ट रोजी लक्ष्मी कॉम्प्लेक्स, खाकसार मस्जिदच्या पाठीमागे, नवरंग मित्र मंडळाजवळ भवानी पेठ
येथील पार्कींगमध्ये त्याचा खून केला होता.



सुर्यकांत उर्फ बंडु आंदेकर (टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात सामाईक साथीदार व नवीन साथीदार यांना सोबत घेऊन कट रचत खून केले आहेत. तसेच यातील आरोपी यांनी जिवे ठार मारणे तसेच तसा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी
चोरी करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे,बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा पुन्हा पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत.

प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१)(ii) ३(२),३(४) नुसार कारवाई करण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी परिमंडळ एकचे उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या मार्फत अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२),३(४) चा अंतर्भाव करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त बनसोडे यांनी मान्यता दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, (पश्चिम प्रादेशीक विभाग) राजेश बनसोडे, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, उपायुक्त कृषिकेष रावळे, सहायक आयुक्त अनुजा देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांनी केली.

Police action against Bandu Andekar gang after Mokka, Ayush Komkar murder case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023