Shahrukh killed पुण्यातील गुन्हेगार ‘हट्टी’ उर्फ शाहरुखचा मोहोळजवळ एन्काऊंटरमध्ये मृत्यू

Shahrukh killed पुण्यातील गुन्हेगार ‘हट्टी’ उर्फ शाहरुखचा मोहोळजवळ एन्काऊंटरमध्ये मृत्यू

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरातील कुख्यात आणि फरार गुन्हेगार शाहरुख ऊर्फ ‘हट्टी’ रहीम शेख याचा मोहोळजवळ रविवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. Shahrukh killed

शाहरुख शेख (वय अंदाजे २३) हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी होता. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०८(२), ३२९(३) अंतर्गत गुन्हा दाखल होता. तो मार्च २०२५ पासून फरार होता.

१४ मार्च रोजी रात्री सय्यदनगर येथे एका फूड डिलिव्हरी बॉयवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शाहरुख आणि नोमान सय्यद (वय २०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमर शकील शेख (वय २१, रा. मोहम्मदवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिलिव्हरी देण्यासाठी जात असताना शाहरुख आणि नोमानने त्यांना अडवले. धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख ६३० रुपये हिसकावून घेतले. विरोध केल्यावर कोयत्याने हल्ला करून कानावर गंभीर इजा केली.



याच रात्री, या दोघांनी जुन्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या घटनांनी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. यानंतर नोमान सय्यदला अटक करण्यात आली होती, परंतु शाहरुख शेख फरार झाला होता.

शहर गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शाहरुख मोहोळजवळील लांबोटी गावात असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार पुणे आणि मोहोळ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे ३ च्या सुमारास लांबोटी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

शाहरुखने पोलिसांना पाहताच गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये शाहरुख गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला सोलापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला ही माहिती पहाटे ५ वाजता देण्यात आली. पोलिसांनी स्पष्ट केलं की हा एन्काऊंटर स्वसंरक्षणाच्या हेतूने झाला असून याची चौकशी प्रचलित नियमानुसार केली जाईल. शाहरुख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

Pune criminal ‘Hatti’ alias Shahrukh killed in encounter near Mohol

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023