विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune drivers शहरातील वाहनचालकांना त्यांचे प्रलंबित वाहतूक दंड सवलतीच्या दरात भरण्याची संधी मिळणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीदरम्यान हा दंड भरण्याची संधी मिळणार आहे. ही मोहीम बुधवार ते शनिवार या कालावधीत पोस्ट ऑफिसजवळील येरवडा वाहतूक शाखेच्या कार्यालयात चालेल. Pune drivers
या लोकअदालतीदरम्यान नागरिकांना हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, सीटबेल्टशिवाय गाडी चालवणे, सिग्नल मोडणे, वेगाने गाडी चालवणे, गाडी चालवतांना मोबाईल वापरणे, यासारख्या वाहतूक उल्लंघनासाठी बसलेल्या दंडात सवलत मिळवता येईल. या कालावधीत वाहनचलकांना जास्तीत जास्त सवलत मिळवता येईल व त्या संदर्भातील सर्व प्रलंबित खटले देखील बंद करता येतील.
मात्र या लोकअदालतीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांना सवलत मिळणार नसल्याचही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. ज्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणे, गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर करणे, हीट अँड रन प्रकरण तसेच महाराष्ट्राबाहेर काढण्यात आलेले चलन यांचा समावेश होत नाही. Pune drivers
अधिकाऱ्यांनी नमूद केले की या प्रयत्नाचे उद्दिष्ट मोठ्या संख्येने प्रलंबित असणारे चलन तडजोडीद्वारे सोडवणे व नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे हाच आहे. ही लोक अदालत १० ते १३ सप्टेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येरवडा वाहतूक शाखेत घेतली जाणार आहे. नागरिक याठिकाणी येऊन त्यांची थकबाकी भरू शकतात. Pune drivers
Pune drivers can pay fines at a discounted rate; Here’s the process
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा