विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Metro गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांचा प्रवास सोपा आणि सहज करण्यासाठी महामेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शनिवार सकाळ (६ सप्टेंबर) ते रविवार रात्री (७ सप्टेंबर) पर्यंत सलग ४१ तास मेट्रो सेवा चालवणार आहे. Pune Metro
या विस्तारित सेवेदरम्यान, वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गांवर एकूण १,३९० मेट्रो फेऱ्या केल्या जातील. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर गाड्या तीन मिनिटांच्या अंतरानेच धावणार आहेत. यामुळे कोणत्याही एका स्थानकावर प्रवाशांची गर्दी होणार नाही.
यावर्षी गणेशोत्सवादरम्यान नागरिकांकडून मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अनेक नागरिकांनी या दरम्यान प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय निवडला आहे. यामुळे विसर्जनाच्या दिवशी मेट्रोच्या सेवा वेळेत वाढ करण्यात आली आहे. Pune Metro
उपनगरातील हजारो नागरिक विसर्जन मिरवणुकीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात येण्याची शक्यता आहे. या दरम्यान काही स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यामुळेच पुणे मेट्रोने महात्मा फुले मंडई, कसबा पेठ, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय आणि स्वारगेट यासारख्या प्रमुख स्थानकावर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
“विसर्जनाच्या आठवड्याच्या शेवटी प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडई स्थानकावरील अपेक्षित गर्दी लक्षात घेता, प्रवाशांना पर्यायी म्हणून कसबा आणि शिवाजीनगर कोर्ट स्थानकांचा वापर करण्याची विनंती करण्यात येत आहे,” असे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर म्हणाले. Pune Metro
तसेच, गर्दी हाताळण्यासाठी दोन शिफ्टमध्ये मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. सगळ्यात जास्त गर्दी होण्याची शक्यता असणाऱ्या शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर एक स्वतंत्र मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन पुणे मेट्रो द्वारे करण्यात आले आहे. या मार्गावरील फेऱ्यांची संख्या ही प्रवाशांच्या मागणीनुसार ठरवली जाणार आहे. दोन फेऱ्यांमध्ये किमान तीन मिनिटांची वारंवारता ठेवण्याचे नियोजन मेट्रोने केले आहे.
या दरम्यान महामेट्रोने प्रवाशांना देखील सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. Pune Metro
Pune Metro provides 41-hour uninterrupted service for immersion
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा