विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील गँगवॉरला नवा कलाटणी मिळाली असून, पोलिसांनी कुख्यात गॅंगस्टर सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरवर दाखल असलेल्या १७ गुन्ह्यांतील जमीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. नुकत्याच घडलेल्या १८ वर्षीय आयुष कोमकर हत्येच्या प्रकरणानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही हत्या आंदेकरने मुलाच्या खुनाचा सूड म्हणून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. Bandu Andekar
पोलिसांच्या माहितीनुसार, आयुषचे वडील गणेश कोमकर याच्यासह एकूण २१ जणांना,मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी झालेल्या माजी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक वनराज आंदेकरखुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकरनेआयुषची हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. Bandu Andekar
गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, १९८१ ते २०२३ दरम्यान आंदेकर विरुद्ध दाखल झालेल्या १७ जुन्या गुन्ह्यांचा तपास सध्या सुरू असून, या आधारे त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे. यातील कोणत्याही प्रकरणात अद्याप शिक्षा झालेली नसली, तरी आयुष हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार म्हणून त्याच्यावर संशय असल्यामुळे कारवाईची शक्यता वाढली आहे.
सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणातील शूटर यश सिदेश्वर पाटील आणि दुसरा आरोपी अमित प्रकाश पाटोळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीतून आंदेकर व त्याचे दोन मुलगे कृष्णा आणि शुभम यांचा सहभाग समोर आला असून, ते सध्या फरार आहेत. “हे आरोपी सापडले की संपूर्ण कटकारस्थान उघड होईल व सर्व सहआरोपींचा पर्दाफाश करता येईल,” असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
आंदेकरवर यापूर्वीच विशेष मकोका न्यायालयाने पुण्यात प्रवेशबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे तो बारामतीत वास्तव्यास होता. मात्र, अलीकडील खुनाच्या प्रकरणात त्याचा सहभाग समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने पुन्हा सक्रिय होत कठोर कारवाई सुरू केली आहे.
Pune Police moves to cancel gangster Bandu Andekar’s bail in 17 cases
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा