Pune Porsche accident case : पुणे पोर्शे अपघात प्रकरण : सात वाजल्यापासून नशेत अल्पवयीनवर ‘प्रौढ’ म्हणून खटला चालवण्याची सरकारी पक्षाची मागणी

Pune Porsche accident case : पुणे पोर्शे अपघात प्रकरण : सात वाजल्यापासून नशेत अल्पवयीनवर ‘प्रौढ’ म्हणून खटला चालवण्याची सरकारी पक्षाची मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी रात्री घडलेल्या भीषण पोर्शे कार अपघात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या अपघातातील मुख्य आरोपी, अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवाल, अपघात होण्याआधीच सायंकाळी ७ वाजल्यापासून दारूच्या नशेत होता, अशी माहिती सरकारी पक्षातर्फे बाल न्याय मंडळात दिली गेली आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी वेदांतवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची जोरदार मागणी केली असून, यावर १५ जुलै रोजी बाल न्याय मंडळ आपला निर्णय जाहीर करणार आहे.
शिशिर हिरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, वेदांत अगरवाल पार्टीसाठी वडिलांची कोट्यवधींची पोर्शे कार घेऊन गेला होता. सायंकाळी ७ वाजल्यापासूनच तो दारूच्या नशेत होता, आणि त्याला नशेत पाहणारे काही साक्षीदारही उपलब्ध आहेत. पार्टीनंतर स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून ड्रायव्हरला शेजारी बसवून त्याने भरधाव वेगात गाडी चालवली.



वेदांतने ट्रम्प टॉवरसमोर पोहोचल्यावर गाडीवरील ताबा गमावून एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर समोरच्या स्विफ्ट कारला जबर धडक दिली. या अपघातात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या अनिल सूर्यवंशी आणि आशिष जाधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वेदांतला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र अल्पवयीन असल्याने त्याला लवकरच जामिनावर सोडण्यात आलं.

अपघातानंतर वेदांतला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, सरकारी पक्षाने कोर्टात असा दावा केला की, वेदांतच्या पालकांनी त्याचा रक्तनमुना बदलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करणारा गंभीर गुन्हा असल्याचंही हिरे यांनी स्पष्ट केलं.

वेदांतवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (गैरइरादतन हत्या), कलम ४६७ (खोटे दस्तऐवज बनवणे) आणि बाल न्याय कायदा २०१५ अंतर्गत कलम २(३३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कलमानुसार प्रौढ म्हणून खटला चालविल्यास कमाल शिक्षेची मर्यादा १० वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत आहे.

वेदांतच्या वकिलांनी मात्र विरोध केला असून, वकील प्रशांत पाटील यांनी साक्ष दिली की, या घटनेमागे वेदांतचा गुन्हेगारी हेतू नव्हता. केवळ निर्णय क्षमतेचा अभाव आणि तरुणाईचा बेफिकीरपणा कारणीभूत ठरला. शिवाय, वेदांत अद्याप अल्पवयीन असून त्याच्या शिक्षणावर, करिअरवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याला ‘बालक’ म्हणूनच न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

संपूर्ण प्रकरणातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असून, बाल न्याय मंडळ १५ जुलै रोजी यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. वेदांतवर प्रौढ गुन्हेगार म्हणून खटला चालवला जाणार की नाही, यावर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले आहे.

Pune Porsche accident case: Government party demands to prosecute minor who was drunk from 7 pm as ‘adult’

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023