international cycling tour : अंतरराष्ट्रीय सायकलिंग टूरसाठी पुणे सज्ज ; करणार तब्बल 145 कोटींचा खर्च

international cycling tour : अंतरराष्ट्रीय सायकलिंग टूरसाठी पुणे सज्ज ; करणार तब्बल 145 कोटींचा खर्च

international cycling tour

विशेष प्रतिनिधी 

पुणे : international cycling tour ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन पुणे शहरात करण्यात येणार आहे. ‘टूर डी फ्रान्स’च्या नावाने होणारी ही स्पर्धा, आता जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात पार पडणार आहे. जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. international cycling tour



पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून एकूण ६८४ किलोमीटर अंतर यात समाविष्ट आहे. यापैकी जवळपास ७५ किलोमीटरचा मार्ग हा पुणे शहरातून जाणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी तब्बल १४५.७५ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत या संदर्भातील सर्व काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

रस्ते विभागानुसार ही कामे चार पॅकेजमध्ये विभागण्यात आली असून, प्रत्येक पॅकेजवर ३० कोटी ते ४४ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकल्पाला अंदाज समितीची मंजुरी देखील मिळालेली आहे. international cycling tour

ही शर्यत केवळ पुण्यासाठीच नव्हे तर भारताच्या सायकलिंग क्षेत्रासाठीही महत्वाची ठरणार आहे. भारतातील ही पहिली ‘UCI 2.2 स्टेज रोड रेस’ असणार असून, तिला आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता मिळाली आहे. व्यावसायिक सायकलपटूंकरिता ही शर्यत ‘लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिक’साठी पात्रता स्पर्धा म्हणूनही महत्त्वाची ठरणार असून, जगभरातील सायकलपटू यात सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील यंत्रणा “कंबर कसून” काम करत आहेत, जेणेकरून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी जागतिक दर्जाचे रस्ते तयार होतील. international cycling tour

या शर्यतीदरम्यान संपूर्ण जगाचे लक्ष पुण्याकडे वेधले जाणार आहे. या शर्यतीदरम्यान सायकलपटू बालेवाडी, युनिव्हर्सिटी रोड, जे. एम. रोड, डेक्कन जिमखाना, कॅम्प, कोंढवा, खडकवासला आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवरून सायकल चालवताना दिसतील. या स्पर्धेमुळे हजारो पर्यटक पुण्यात येणार असल्याने क्रीडा पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Pune ready for international cycling tour; will spend a whopping Rs 145 crores

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023