विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune’s air quality हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका गेल्या वर्षभरापासून अनेक प्रयत्न करत आहे. अखेर महानगरपालिकेच्या या प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. पुणे शहराने हवेच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय पातळीवर आता थेट दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केंद्र सरकारच्या १३० शहरांच्या सर्वेक्षणात पुण्याचा हवेच्या गुणवत्तेत गेल्या वर्षीचा २३ वा क्रमांक सुधारत यंदा १० वा आला आहे. पुण्यासोबतच नागपूर आणि अहमदाबाद यांचा देखील या यादीत दहावा क्रमांक आहे, तर इंदौर प्रथम स्थानावर आहे. Pune’s air quality
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मागील वर्षी प्रदूषणाचे स्रोत आणि त्यावर नियंत्रणासाठी केलेल्या स्थानिक उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये, वाहनांचे धुरकट उत्सर्जन, बांधकामे, उद्योगधंदे, रस्त्यावरील धूळ व कचरा जाळणे हे हवेची गुणवत्ता ढासळण्यामागचे महत्त्वाचे घटक मानले गेले. Pune’s air quality
वर्षभरात कोणती पाऊले उचलली गेली ?
या पार्श्वभूमीवर पुण्याला पंधराव्या वित्त आयोगातून एकूण ३११ कोटींचा निधी मंजूर झाला होता. आता त्यापैकी १६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ज्यामधून सीएनजी कचरा गाड्या, ई-बसेस व ई-रिक्शा रस्त्यावर आणल्या गेल्या. तसेच, धूळ नियंत्रणासाठी पाणी शिंपडणाऱ्या गाड्या आणल्या गेल्या तर बांधकाम प्रकल्पांना ग्रीन नेट्स, सेन्सर्स आणि नियमित शिंपडणीचे बंधन घालण्यात आले. स्मशानभूमींमध्ये लाकडी चितांऐवजी वीज किंवा गॅस यंत्रणा वापरण्यास प्रोत्साहन दिले गेले.
कचरा जाळण्यावर कठोर कारवाईसह जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. या सातत्यपूर्ण उपायांमुळे प्रदूषणात लक्षणीय घट झाल्याचे महापालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त संतोष वरुळे यांनी सांगितले. Pune’s air quality
Pune’s air quality improves rapidly; ranks 10th in national survey
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा