विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ४०९ शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याने सर्वच दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी होणार आहे .
ससून रुग्णालयाने तपासणी करण्यास नकार दिल्याने या सर्व दिव्यांग शिक्षकांना आता आपापल्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी मुंबईतील जे. जे. किंवा जी.एम.सी. रुग्णालयात करावी लागणार आहे. याशिवाय राज्याच्या आरोग्य परिमंडळांच्या क्षेत्रातील रुग्णालयांचाही आणखी पर्याय असणार आहे. त्यामुळे ही फेरपडताळणी पूर्ण झाल्याशिवाय एकाही दिव्यांग शिक्षकाला जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गट विकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) आदेश दिला आहे. केवळ शिक्षकच नव्हे तर, जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी. यासाठी संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना कळविण्यात यावे. एकही दिव्यांग कर्मचारी या फेरपडताळणीतून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे गजानन पाटील यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
याआधी ही फेरपडताळणी करण्याबाबत पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला कळविण्यात आले होते. परंतु ससून रुग्णालयाने यास अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत नकार दिला होता. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यल्लप्पा जाधव यांनी पुणे जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले होते. शिवाय या दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी ही मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्याचा सल्ला डॉ.जाधव यांनी पुणे जिल्हा परिषदेला दिला होता. यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांग शिक्षकांच्या बदल्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, आता या आदेशानुसार दिव्यंगत्वाची फेरपडताळणी पूर्ण झाल्याशिवाय बदलीतून सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र यापैकी अनेक दिव्यांग प्रमाणपत्रे ही बोगस असल्याबाबच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. या तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गंभीर दखल घेतली होती आणि यानुसार शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी याबाबत ससून रुग्णालयाला पत्र पाठविले होते. या पत्रासोबत जिल्ह्यातील ४०९ दिव्यांग शिक्षकांची यादी देण्यात आली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी नाईकडे यांच्या या पत्राच्या अनुषंगाने ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी हे पत्र दिले होते.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि. १८ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित बदली धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी विविध संवर्ग निर्माण केले आहेत. यापैकी विशेष संवर्ग भाग एक हा बदलीतून सुट मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांचा आहे. या संवर्गात दिव्यांग आणि दुर्धर आजाराने बाधीत असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या संवर्गात बसण्याची बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप करण्यात आला आहे
Re-examination of teachers’ disabilities will be held at J.J. and GMC hospitals in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी