विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune gang war पुण्यातील नानापेठेत शुक्रवारी गॅंग वॉरची धक्कादायक घटना घडली आहे. वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकर याची हत्या करण्यात आली आहे. यावरून आता रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. Pune gang war
शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास गोविंद कोमकर या १९ वर्षीय मुलावर आंदेकर टोळीने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत रोहित पवार यांनी यासंबंधी आपली नाराजी व्यक्त केली.
पुण्यात पोलिसांच्या नाकावर टीच्चून रक्तरंजित होली खेळली जात आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच अशा घटनांमुळे सामान्य माणूस आपलं जीव मुठीत घेऊन बसला आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. सोबतच, आता ‘नव्या पुण्याचे शिल्पकार कुठे आहेत?’ असं खोचक प्रश्न देखील त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. Pune gang war
काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात उत्साहाने साजरा केला जातो. असे असतांना टोळी युद्धाचा भडक उडतो…… एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टीच्चून पुण्यात रक्तरंजित होली खेळली जाते…… प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसला आहे. अशा परिस्थिति लोक विचारत आहेत ‘कुठे आहेत नव्या पुण्याचे शिल्पकार?’
गॅंग वॉरचं नेमकं प्रकरण काय?
मागील वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नानापेठेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून त्यांना मारण्यात आले होते. या प्रकरणात वनराज यांच्या बहिणीचा दीर असलेला गणेश कोमकर हा मुख्य आरोपी होता. Pune gang war
या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंद कोमकर याला लक्ष्य केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष बाब म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष लक्ष्य मात्र दुसऱ्याच ठिकाणी साधले. त्यामुळे पोलिसांनाही या गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला असून खून रोखण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अपयश आले आहे. Pune gang war
दरम्यान, पुण्यात बंडू आंदेकर टोळी विरुद्ध सूरज ठोंबरे टोळी असे वैर आता वाढले आहे. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आंदेकर टोळीने 2023 मध्ये ठोंबरे टोळीचे शुभम दहिभाते आणि निखिल आखाडे यांच्यावर नाना पेठेत हल्ला केला होता. या हल्ल्यात निखिल आखाडेकर याचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे ठोंबरे टोळीत संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी ठोंबरे टोळीने आंदेकर टोळीच्या माजी नगरसेवक वानराज आंदेकर यांची हत्या केली होती. Pune gang war
Criminals celebrate bloody Holi by pointing fingers at the police; Rohit Pawar’s criticism of Pune gang war!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा