विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर साेडला आहे. शरद पवार यांनी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे आणि इतर नेते याबाबत निर्णय घेतील असे सांगितले हाेते. यावर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या मनात जो निर्णय असेल त्यानुसार पक्ष निर्णय घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. Supriya Sule
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
सुप्रिय सुळे म्हणाल्या, एकत्र येणे हा पक्षाचा निर्णय आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशकं म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे. पवार साहेब जो काही निर्णय घेतात तो पक्षाचे पदाधिकारी, त्या शेवटच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊनच त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेतो. आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. पक्षाचे कार्याध्यक्ष, अनेक कार्यकर्ते त्यांना जरी वाटत असलं तरी नेतेमंडळी पण महत्वाचे असतात. कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की, ताई निर्णय घेतील. पण मी दौरे आणि कामात व्यस्त होते. मी उद्या दिल्लीला जाणार आहे. तेव्हा परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा, कार्यकर्त्यांची भेट होईल. तेव्हाच खरंतर त्यांच्या मनात काय आहे हे मला कळेल. Supriya Sule
पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतील या अमाेल मिटकरी यांच्या वक्तव्यावर सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आम्ही बहीण भाऊ जन्मापासून आहोतच. पक्ष म्हणून एकत्र येतील हे अमोल मिटकरी यांची जी इच्छा आहे. त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.
Supriya Sule explained the merger of NCP, as per the mind of the activists
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी