विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune : चौकशी समितीच्या अहवालानंतर शासनाने पुण्यातील तत्कालीन जिल्हा अधीक्षक व सध्या उपसंचालक भूमी अभिलेख विभागाचे पुणे (एकत्रीकरण) सूर्यकांत मोरे यांचे अखेर निलंबन केले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून मोरे वादात सापडले होते.
मोरे यांच्या पुणे जिल्हा अधिक्षकपदावरील कार्यकाळात झालेला अनियमित कारभारामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचे निलंबन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मोरे यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने जारी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोजणी विभागाचा हवेली व पुणे जिल्हा कार्यालयांत अनियमित कारभार उघड झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार समोर आला. त्यानंतर शासनाने हवेली उपअधीक्षक कार्यालय व पुणे जिल्हा अधीक्षक कार्यालयाची तपासणी शासनाने नियुक्त केलेल्या समिती मार्फत केली होती. यामध्ये हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांचेवर ठपका ठेवण्यात आला होता.
काही प्रकरणांमध्ये पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची गांभीर्याने दखल घेत शासनाने पाटील यांना यापूर्वीच निलंबित केले होते. हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक पाटील यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांच्यावर कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते.
अखेर गंभीर अनियमित कारभाराची दखल शासनाने घेत सूर्यकांत मोरे यांना निलंबन केले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यात आली आहे.
Suryakant More, the then District Superintendent of Land Records in Pune, was suspended.
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा