Ghayval gang : कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या घायवळ टोळीचा काळा इतिहास!

Ghayval gang : कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या घायवळ टोळीचा काळा इतिहास!

Ghayval gang

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ghayval gang : शहरात सतत होणाऱ्या टोळी युद्धांमध्ये गेल्या आठवड्यातल्या घटनेने देखील भर पडली आहे. केवळ गाडीला साइड न दिल्याने घायवळ टोळीतील गुंडांनी कोथरुडमध्ये गोळीबार केला. या घटनेत एक व्यक्ति गंभीररीत्या जखमी देखील झाली. विशेष म्हणजे जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समोर आलंय.

घायवळ टोळीची सुरवात नेमकी झाली कशी?

पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या घायवळ टोळीचा म्होरक्या, निलेश घायवळ हा मुळचा अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील सोनाई गावचा रहिवासी. ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आज पुणे ज्याला एक गुंड म्हणून ओळखते, तो निलेश घायवळ चक्क कॉमर्स ग्रेज्युएट आहे. कारण शिक्षणाच्या निमित्ताने खेडेगावातून पुण्यात आलेल्या या निलेशने आपलं ग्रेज्युएशन तर पूर्ण केलं. मात्र शिक्षण घेत असतानाच तो गजा मारणेच्या संपर्कात आला आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याच्या टोळीसोबत जोडला गेला.



सुरुवातीच्या काळात हा निलेश घायवळ गजा मारणेच्या टोळीत एक गुंड म्हणून काम करत होता. त्याच काळात त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यांसारख्या कित्येक गुन्ह्यांची नोंद झाली. गुन्हे अंगावर घेणारा हा निलेश घायवळ गजा मारणेचा एक विश्वासू सरकारी बनला.

मात्र याच काळात गजा मारणेच्या साथीने निलेश घायवळने पुण्यात एका व्यक्तीचा खून केला आणि या खुनानंतर पुण्यातल्या गल्लीबोळात त्याच्या नावाची चर्चा झाली. पुढे अशाच एका प्रकरणात त्याला गजा मारणेच्या बरोबरीने तुरुंगवास भोगावा लागला. मात्र जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात पैसा आणि वर्चस्ववादावरून वाद निर्माण झाले. त्यांच्यातील हे वाद विकोपाला गेल्यामुळे दोघांची फाटाफूट झाली. परिणामी निलेश घायवळने गजा मारणेची साथ सोडून गुन्हेगारी विश्वात आपलं एक स्वतंत्र्य अस्तित्व निर्माण केलं.

कालांतराने पुण्यातील कोथरुड परिसरातल्या सुतारवाडीत घायवळ टोळीची दहशत निर्माण झाली. मात्र गजा मारणेशी वाकडं घेऊन बाहेर पडलेल्या घायवळ टोळीचं वाढतं वर्चस्व गजा मारणेंना पचत नव्हतं. त्यामुळेच मारणे अन् घायवळ यांच्यातले संबंध बिघडल्यानंतर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले. २०१४ मध्ये त्यांनी घायवळचा विश्वासू असलेल्या पप्पू गावडेचा देखील खून केला. तेव्हा पप्पू गावडेच्या खुनाचा बदला घ्यायचा, म्हणून घायवळ टोळीने गजा मारणेच्या टोळीतील गुंड असलेल्या सचिन कुंडलेची हत्या केली.

पुण्यातील दत्तवाडी या मध्यवर्ती भागात मारणे टोळी आणि घायवळ टोळीत हा रक्तरंजित थरार झाला. या थरारात घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा पाठलाग करुन अगदी फिल्मी स्टाईलने त्याचा मर्डर केला. त्यानंतर पुण्यात पेटलेलं हे टोळीयुद्ध आटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि निलेश घायवळ या दोघांनाही ताब्यात घेतलं.

तसंच या प्रकरणी तब्बल २६ जणांवर मकोकाअंतर्गत कारवाई देखील केली गेली. याच प्रकरणामुळे निलेश घायवळ यांना तब्बल ७ वर्ष तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. मात्र तुरुंगातून सुटून देखील घायवळची दहशत काही कमी झाली नाही. त्यामुळेच सध्या निलेश घायवळसह त्याच्या टोळीतील गुंडांवर मकोका, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी वसुली, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत, मारामारी यांसारख्या १४ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

अजूनही कोथरूड, सुतारवाडी, पाषाण, बावधन, मुळशी या पुण्यातील विविध भागांमध्ये घायवळ टोळीची चांगलीच दहशत बघायला मिळते. यात विशेष बाब म्हणजे, या घायवळ टोळीची फक्त पुण्यातच नाही, तर पिंपरी चिंचवड, धाराशिव, जामखेड यासह इतर ठिकाणी देखील दहशद निर्माण झाली आहे. याच दहशतीच्या जोरावर ही टोळी सामान्य नागरिकांना वेठीस धरतीये.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील गेंगस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निलेश घायवळने थेट मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तिथे जाऊन त्याने शिंदेंसोबत फोटोसेशन देखील केलं होतं. शिवाय काही ठिकाणी हा घायवळ निलेश लंकेंसोबत सुद्धा दिसला होता. एवढंच नाही, तर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी तर निलेश घायवळच्या टोळीला राम कदमच पाठबळ देत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच आता या घायवळ टोळीच्या गुन्हेगारीची चर्चा होत असताना, त्याच्या पाठीशी मोठा राजकीय वरदहस्त असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

मात्र आता अशा परिस्थितीत पुण्यात वाढत असलेल्या या टोळी युद्धांच्या दहशदीला आळा घालणे आणि शहरात पुन्हा एकदा सुरक्षित वातावरण निर्माण करून कायदा व सुवस्था प्रस्थापित करणे, हे पुणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान असणार आहे.

The black history of the Ghayval gang that wreaked havoc in Kothrud!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023