विशेष प्रतिनिधी
पुणे : Belbagh Chowk गणपती विसर्जनादरम्यान पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात २० वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात प्रशिक्षणार्थी महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता सिसिटीव्ही फुटेजचा तपास करत पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. Belbagh Chowk
अनोज बबन नवगिरे (वय-३४) व चिराग नरेश किराड (वय-२४) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघंही आरोपी त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्य होते. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्रिताल ढोल ताशा पथकाचे प्रमुख आणि तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांच्या समक्ष सिसिटीव्ही फुटेज बघत असतांना तक्रारदार यांनी दोन्ही आरोपींना ओळखले. Belbagh Chowk
सदर आरोपींना न्यायालयात दाखल केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांच्या न्यायालयाने आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यावेळी युक्तिवाद करतांना बचाव पक्षाचे वकील प्रताप परदेशी यांनी, बेलबाग चौकात विसर्जन मिरावणुकीदारम्यान इतकी गर्दी असते की पोलीस आयुक्त यांना देखील धक्काबुक्की होऊ शकते, असा अजब दावा केला. तसेच, बेलबाग चौकात मिरवणुकीदारम्यान माझी देखील पॅंट फाटली होती. त्यामुळे, आरोपींनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक केलं नसल्याचही त्यांनी म्हटलं.
केवळ इतकेच नाही तर, ‘मी पत्रकार संघाचा निवडणूक अधिकारी आहे, मला माहीत आहे ही तरुणी त्या पोर्टलसाठी काम करणारी सदस्य नाही.’ असा दावा देखील बचाव पक्षाचे वकील प्रताप परदेशी यांनी केला आहे. Belbagh Chowk
याप्रकरणात सरकारी वकील यांनी सांगितले की, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. हा महिला सुरक्षेसंदर्भातला दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. सदर गुन्ह्यातील घटनास्थळाचे सिसिटीव्ही फुटेज पंचनामा करून, पुरावा म्हणून जमा केलेले आहे. आरोपींनी सदरचा गुन्हा हा जाणीवपूर्वक केलेला असून, याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील करत आहेत.
सध्या दोन्ही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत. Belbagh Chowk
Two members of the drum team arrested in the molestation case in Belbagh Chowk
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा