Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना घरचा आहेर

Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना घरचा आहेर

विशेष प्रतिनिधी

पुणे : मागासवर्गीय समाज असेल त्याना लोकसंख्येप्रमाणे मी निधीचे वाटप करत असतो. त्याचे सूत्र आपण सर्वांनी स्वीकारले आहे. मात्र काही लोक जाणीवपूर्वक आपले सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत. मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला असा आराेप केला जात आहे. अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का? असा सवाल करत मंत्री संजय शिरसाट यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी घरचा आहेर दिला.



राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन साेहळ्यात अजित पवार बाेलत हाेते. अजित पवार यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारून भाजपसोबत सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्या भाजपासोबत जाण्याच्या या निर्णयावर अनेकजण आक्षेप घेतात. भाजप आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका वेगळी आहे, असे असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? असा सवाल उपस्थित केला जातो. वर्धापन दिन मेळाव्यात त्यांनी याच प्रश्नाचे थेट आणि जाहीर उत्तर दिले आहे.

अजित पवार  (Ajit Pawar )म्हणाले, मला काहीजण विचारतात की तुम्ही भाजपसोबत का गेले? आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधी पक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही. आपण काही साधूसंत नाही. आपण लोकांना दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत. त्यामुळेच आपण भाजपसोबत, एनडीएसोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचे ठरवले.
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, धर्मनिरपेक्षता विचारधारा जपणारे चंद्राबाबू नायडू हे देखील एनडीएसोबत गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही कधीकाळी एनडीएसोबत होत्या. लालू प्रसाद यादव हेही एनडीएसोबत होते. आजही अनेकजण एनडीएसोबत आहेत. शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे. केंद्र आणि राज्याच्या योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे.

काही जण म्हणतात की, मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. अजित पवारांनी बजेट वळवले. अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का? एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही. यावेळी 7 लाख 20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना 41 टक्के निधी आदिवासी विभागाला दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. हे कधीही पुढे येतच नाही. कोणी तरी सांगते अजित पवारांनी अन्याय केला. कार्यकर्ता हे ऐकून खचतो. मात्र त्याला सत्य माहीत नसते, असेही पवारांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागात मागासवर्गीय समाज आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा 38 टक्के निधी अधिक दिला. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सांगितलेले आहे. पण त्याला जेवढी प्रसिद्धी पाहिजे तेवढी मिळाली नाही. मागासवर्गीय समाज व आदिवासी समाजाच्या मनात निधी वळवल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता, पण राष्ट्रवादीचे लोक केवळ फुले शाहू आंबेडकरांचे नाव भाषणापुरते वापरतात का? नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीत करतो, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, मागच्यावेळी लोकसभेत दारूण पराभव झाला. चारच जागा मिळाल्या. 75 टक्के पराभव स्वीकारावा लागला. तिथे थोडी गडबड झाली. कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाली. काय झाले. कशामुळे झाले. आम्हीही विचार केला. आता लोकसभेत फटका बसल्यावर लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यावर महायुतीला पाठबळ मिळेल. आम्ही चर्चा केली आणि लाडकी बहीण योजना आणली, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश दिले. पुणे पिंपरी चिंडवडमध्ये 10 लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचे टार्गेट आपण ठेवले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर इंजिनिअर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले.

आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यांत आहे. 28 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 285 पंचायत समित्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. आम्हाला आमदारकी, खासदारकी मिळाली. कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमदार, मंत्री, खासदार झालो. आता त्याच कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत. आपण कुठेच कमी नसतो. फक्त प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटले जाते, असे आवाहन पवार यांनी केले.

कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. आज आपण आपल्या पद्धतीने सगळ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीसाठी झोकून देऊन काम केले पाहिजे. महिला, तरुणांना आपण संधी मोठ्या प्रमाणावर देणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Willful Defamation Pay My Pocket? Ajit Pawar’s social welfare minister Sanjay Shirsat is the envy of the house

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023