शिरूर मतदारसंघाचं २००९ आणि २०१४ मध्ये शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेतर्फे प्रतिनिधित्व केलं होतं. २०१९ला राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे या मतदारसंघातून विजयी झाले. आताची म्हणजेच येत्या २०२४ची परिस्थिती वेगळी असणार आहे. शिवाजीराव आढळराव शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तिकडे अजित पवार गटाचे विलास लांडे यांना शिरूरची उमेदवारी मिळणार का, याविषयीच्या चर्चा सुरू आहेत. अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे.