विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune गणपती विसर्जन मिरवणुकीत प्राशिक्षणार्थी युवती पत्रकाराला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग व लैंगिक छळ केल्या प्रकरणी पुण्यात दोन जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ढोल-ताशा पथकातील दोन्ही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलं होता. मात्र या दोन्ही आरोपींना जामीन देण्यास पुणे न्यायालयाने नकार दिला आहे. Pune
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
आरोपींविरोधात असलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत अशात जामीन झाल्यास ते तक्रारदार व साक्षीदाराला धमकावू शकतात. त्यामुळे आरोपींना जामीन देता येणार नाही, असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए पांडे यांनी जमीन फेटाळला. अनोज बबन नवगिरे (वय ३४, रा. मंगळवार पेठ) आणि चिराग नरेश किराड (२४, रा. लाल देऊळ सोसायटी) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्रिताल ढोल-ताशा पथकाचे सदस्य असलेल्या या आरोपींविरोधात विनयभंग, लैंगिक छळ आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, वीस वर्षाच्या महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात ते पावणेआठच्या दरम्यान बेळबाग चौकात घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. Pune
मात्र या अर्जाला सरकारी वकील अमर ननावरे यांनी विरोध केला. यामागे, आरोपींना जामीन मिळाल्यास ते तक्रारदार व साक्षीदारांना धमकावू शकतात. त्यामुळे, या प्रकरणात पीडितेला संरक्षण देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य् धरत न्यायालयाने अखेर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. Pune
Court rejects bail of two in molestation case of female journalist in Pune
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल