विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Commissioner राज्य सरकारच्या इतर विभागांकडून सहकार्य न मिळाल्याने विलंब होऊन पुण्यातील अनेक नागरी विकास प्रकल्प रखडले आहेत. अलिकडेच झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी नमूद केले की राज्य विभाग आवश्यक मान्यता आणि प्रमाणपत्रे रोखत असल्याने अनेक कामे अडकली आहेत. Pune Commissioner
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रखडलेल्या प्रकल्पांची यादी सादर करून या प्रकरणात त्यांच्या सहकार्याची मागणी करणार आहे. पुण्यात उड्डाणपूल, नदी पूल, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते रुंदीकरण यांसारखे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, महापालिकेने एक विशेष “युद्ध कक्ष” देखील स्थापन केला आहे.
परंतु तरीदेखील आयुक्तांनी नमूद केले की, वारंवार पाठपुरावा करूनही प्रकल्पांची कामं पूर्ण न झाल्याने खर्च आणि वेळ दोन्ही वाढत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘जेआयसीए’-समर्थित सांडपाणी प्रकल्प. ज्याचा निर्णय जरी आधीच घेतला गेलेला असला तरीदेखील केवळ बोटॅनिकल गार्डनमधील जमीन अद्याप हस्तांतरित न झाल्यामुळे तो अजूनही रखडलेला आहे. Pune Commissioner
जलसंपदा विभागाने पार्वती वॉटर वर्क्स ते भवानी पेठ पर्यंत नवीन १२०० मिमी पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी, जमीन भाड्याच्या १० कोटी रुपयांची मागणी करून एक नवीन अडथळा निर्माण केला आहे. ४० वर्षे जुन्या आणि अपुऱ्या पाईपलाईनची जागा घेण्यासाठी बनवलेली ही लाईन मित्रमंडळ चौक ते नेहरू रोडपर्यंत कालव्याच्या बाजूने नेण्याचा प्रस्ताव आहे. ही मागणी आता राज्य सरकारकडेही केला जाईल.
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, पुण्याचा विकास हा सर्व राज्य विभागांच्या सहकार्यावर तसेच सहयोगावर अवलंबून आहे, परंतु ते अद्यापही शाक्य झालेलं नाही. त्यामुळे आता हा विषय मुख्यमंत्रांकडे नेण्याशिवाय महापालिकेकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. Pune Commissioner
Pune Commissioner to meet Chief Minister regarding stalled projects!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा