विशेष प्रतिनिधी
पुणे : Sharad Pawar सरहद संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी निघालेल्या शरद पवारांचा ताफा काही पुणेकरांना अडवून कारमध्ये बसलेल्या पवारांच्या हातात एक कागद देऊन आमची घरं वाचवा अशी मागणी केली. या लोकांनी पवारांकडे दिलेला कागद हे घरं वाचवण्यासंदर्भातील निवेदन होतं. हा सारा प्रकार निंबाळकरवाडी येथे घडला.
शरद पवारांचा ताफा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी अचानक काही स्थानिकांनी त्यांचा कारचा रस्ता अडवला. या स्थानिकांनी पवारांकडे निवेदनाचा कागद सोपवत, ‘आमची घरं वाचवा’ अशी मागणी करत थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तुम्ही हा प्रश्न मांडा अशी मागणी स्थानिकांनी केली. ‘एवढा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला, तुम्ही घाला लक्ष’ अशी मागणी स्थानिकांनी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी, “आम्ही गरीब लोक आहोत. आमची घरं वाचवा साहेब,” असं शरद पवारांसमोर हात जोडून म्हटलं. Sharad Pawar
यावेळेस आंदोलकांनी अनेक लोकप्रतिनिधींसमोर हा प्रश्न मांडला असल्याचं सांगितलं. यामध्ये स्थानिकांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या नावांचा उल्लेख शरद पवारांसमोर केला. शरद पवारांनी स्थानिकांनी दिलेलं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्या म्हणणं ऐकून घेत होकारार्थ मान डोलवत आपण नक्की यात लक्ष घालू असं सूचित करत निवेदनकर्त्यांचा निरोप घेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.
पुणे रिंग रोड प्रकल्पातील खेड-केळगाव भागातून जाणाऱ्या मार्गात अनेक घरं येत असून ही घरं प्रकल्पासाठी हटवावी लागणार आहेत. पुणे रिंग रोड हा एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आहे, जो शहराच्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी बांधण्याचा मानस आहे. हा 170 किलोमीटर लांबीचा सहा-रस्त्यांचा एक्सप्रेसवे आहे, जो पुणे शहराभोवती वळसा घालून बांधला जात आहे. यामुळे शहरातील ट्रॅफिक जाम कमी होईल आणि मुख्य शहर बाहेरील भागांना जोडले जाईल. Sharad Pawar
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक सोयी सुधारणे, नवीन व्यावसायिक व आवासीय विकासाला चालना देण्याचा या प्रकल्पाचा मानस असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च 10 हजार कोटी रुपये इतका आहे. सध्या अनेक ठिकाणी या प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे. पूर्व भागामध्ये निंबाळकरवाडी ज्या ठिकाणी आहे तेथील खेड-केळगावमध्ये जमीन अधिग्रहण आणि बांधकाम कार्य सुरू असल्यानेच घरं वाचवण्यासाठी स्थानिकांकडून प्रयत्न सुरु आहेत. या नियोजित प्रकल्पामध्ये बदल करुन स्थानिकांच्या घरांना हात लागणार नाही अशी व्यवस्था करण्याची येथील लोकांची मागणी आहे. Sharad Pawar
Pune residents block Sharad Pawar’s car! Demand to save our homes
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!