पुणे : Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sansthan Trust : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानांकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. काल सिद्धिविनायक गणपती ट्रस्टच्या वतीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. आता राज्यातील इतर देवस्थानेही शेतकऱ्यांसाठी पुढे येताना दिसत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थान ट्रस्ट, आळंदी यांच्याकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थान कमिटी, आळंदी’ यांच्याकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी २१ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थानचे आभार मानले.
राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. शासकीय पातळीवर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक सुविधा तात्काळ पुरवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. राज्यातील नुकसानाची माहिती देण्यासाठी आणि केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असला तरी, एकजुटीने या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आहे. शासन, संस्था आणि सामान्य नागरिकांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना लवकरच सामान्य जीवनाकडे नेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी आशा आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sansthan Trust, Alandi provides assistance of Rs. 21 lakh for flood victims
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















