विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vantara सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) गुजरातमधील जामनगर येथील वनतारा या प्राणीसंग्रहालय व वन्यजीव पुनर्वसन केंद्राला मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आपल्या अहवालात वनतारामध्ये सर्व नियमांचे काटेकोर पालन होत असल्याचे नमूद केले आहे.
गुजरातमधील जामनगर येथे स्थापन करण्यात आलेले वनतारा हे प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव पुनर्वसन केंद्र गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे. येथे बेकायदेशीररीत्या हत्ती, पक्षी आणि इतर दुर्मिळ प्राणी आणले जात असल्याचा गंभीर आरोप एका याचिकेत करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) सखोल चौकशी करून हे आरोप फेटाळले आहेत. Vantara
हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात ‘सीलबंद लिफाफ्यात’ सादर करण्यात आला असून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे व पुरावेही जोडली गेली आहेत. न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि प्रसन्न बी. वरळे यांच्या खंडपीठाने हा अहवाल नोंदवून घेतला आहे.
वनतारावरील आरोप आणि चौकशी
वनतारा विरोधातील ही चौकशी सी.आर. जया सुकीन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सुरू झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, वनताराने हत्ती, दुर्मिळ पक्षी, तसेच इतर अनेक संरक्षित प्रजाती बेकायदेशीररीत्या त्यांच्या केंद्रात ठेवलेल्या आहेत. याचिकेत काही प्राणी तस्करीमार्गे आणले गेल्याचे देखील आरोप करण्यात आले होते आणि त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन झाले असल्याचं बोललं जात होतं. Vantara
या सर्व आरोपांची पडताळणी करण्यासाठी एसआयटीच्या विशेष तपास पथकाने ऑगस्ट महिन्यात वनताराला भेट दिली होती. या पथकाने संपूर्ण तीन दिवस केंद्रातील विविध भागांची पाहणी केली. सोबतच, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि आवश्यक नोंदी देखील तपासल्या. इतकेच नव्हे, तर या संदर्भात विविध राज्यांच्या वनविभागांशी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी संवाद साधून त्यांची देखील मते जाणून घेण्यात आली.
अखेर, सर्व माहिती, चौकशी आणि पडताळणीनंतर समितीने सर्वोच्च न्यायालयाला कळवले की, वनतारामध्ये प्राणीसंवर्धन व पुनर्वसनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया, नियम आणि मानकांचे पालन केले जात आहे. त्यामुळे केंद्राविरोधातील कोणत्याही आरोपांना आधार नसल्याचे स्पष्ट झाले. Vantara
SIT gives clean chit to Gujarat’s ‘Vantara’
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा