विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Vadettiwar काेणी रांगाेळी काढावी, त्यातून उद्रेक व्हावा असा डाव आखण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या दंगलीवरून आरोप करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी रडत आहे, लोकांची घर गेली, अन्नधान्य, कपडे ,पीक गेली. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. पण कोणी रांगोळी काढावी त्यातून उद्रेक व्हावा , दोन समाजात वाद निर्माण केला जात आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी या गोष्टी घडवून आणल्या जात आहे. Vijay Vadettiwar
राज्यातील पूरस्थितीवरून सरकारला जाब विचारताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २४ जिल्ह्यांतील १३७ तालुके बाधित झाले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यातील शेती पिकांचे नुकसान २६ लाख हेक्टरवर गेले आहे. अशा वेळी बँकेकडून शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीची नोटीस कशी काय देण्यात आली?
सरकार झोपा काढत आहे का?
अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. खरीप हंगामातील सुमारे ५२ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात गेले असून, खरीप हंगाम तर हातातून निसटला आहेच, परंतु रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेल्याने शेतकरी रब्बी हंगामापासून देखील वंचित राहणार आहे.अशा वेळी बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. सरकारने बँकांना का सूचना दिल्या नाही? शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली थांबली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. Vijay Vadettiwar
सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. म्हणूनच त्यांना लवकर पुन्हा उभं करण्यासाठी दिवाळीपूर्वीच भरीव मदत केली पाहिजे. अजूनही केंद्राकडून पाहणी करायला पथक आलेले नाही, केंद्राला राज्य सरकारकडून कधी प्रस्ताव जाणार आहे ,मदत कधी मिळणार? असा सवाल यांनी केला. Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar alleges government-sponsored riots in Ahilyanagar to divert attention from farmers’ issues
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















