Harshvardhan Sapkal : मंत्रालय आणि विधिमंडळ अदानीला कधी देणार आहात ? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Harshvardhan Sapkal सध्या सत्तेत असलेले भाजप महायुतीचे सरकार हे सामान्य जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसते आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन देखील दिली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत आणि विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार आहात, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.Harshvardhan Sapkal

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांना घरे देण्यासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा हस्तांतरित करताना करारनाम्यातील अटी -शर्तीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जोरदार टीका केली.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा युती सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहिण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी इतर योजनांचे पैसे वळवले जात आहेत. शेतकरी कर्जमाफी करणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजपा युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे तर फक्त भोपळा, असे सांगून सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहीण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत. शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत. परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजप युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेतीच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

When will you give the ministry and the legislature to Adani? Harshvardhan Sapkal questions

महत्वाच्या बातम्या