Sanjay Raut : महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी कोणत्याही त्याचा तयार, मनसेसोबत युतीसाठी तडजोडीची संजय राऊत यांची तयारी

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी कोणत्याही त्याचा तयार, मनसेसोबत युतीसाठी तडजोडीची संजय राऊत यांची तयारी

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, मराठी माणसाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे”, असे म्हणत राऊतांनी युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम दिलेला नसून ती दारं अद्याप खुली असल्याचे सूतोवाच केले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमीलन होणार का? शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का ?अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला वेगळंच वळण मिळालं. जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटातर्फे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आहे का ? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, मराठी माणसाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे”, युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम दिलेला नसून ती दारं अद्याप खुली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले

राऊत म्हणाले, शिवसेना ही विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आहे आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली, तेव्हा आम्ही सत्तेत असतानाही चांगले काम करून दाखवले. पण सत्ताधाऱ्यांना शिवसेनेचे भय कायम वाटत आले आणि ते वाटायलाच हवे अशा प्रकारे या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केली असे संजय राऊत म्हणाले. तसेच, महाविकास आघाडीने मजबूतपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. ही अनेकांची भूमिका आहे. आम्ही एकत्रच आहोत, पण एकत्र राहत असतानाही शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही. मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा, अन्यायाविरोधात लढण्याचा तो विचार असेल, शिवसेनेची ताकद हीच विचारप्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे. शिवसेना सत्तेसाठी कधीही कोणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाहीत. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा तर मर्दांचा महासागर आहे.

Sanjay Raut is ready to compromise for an alliance with MNS, for the benefit of Maharashtra and the welfare of the Marathi people.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023