पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे, चंद्रकांत पाटील यांचे शरद पवारांना उत्तर

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, त्यांची तुलना होऊच शकत नाही, असे उत्तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना दिले आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जवाहरलाल नेहरू आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावर पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार हे नेहमीच ‘गुगली’ टाकत असतात.

पवारांना प्रत्यक्षात हेच म्हणायचं होतं की मोदी हे मोदी आहेत, त्यांची नेहरूंशी काय तुलना होणार? ती होऊच शकत नाही. पुढे बोलताना पाटील म्हणाले, नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले, त्याला आपण काय करू शकतो? पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात प्रचंड संघर्ष केला आहे.



स्वातंत्र्यापूर्वी ‘देशासाठी मेले पाहिजे’ हा नारा होता, पण आता ‘देशासाठी चांगलं जगलं पाहिजे’ आणि देशाचा विकास केला पाहिजे हा नारा आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव अत्यंत अभिमानाने आणि चांगल्या पद्धतीने कमावले आहे. त्यामुळे मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत, असेही पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता हाती घेत एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. या नवीन कार्यकाळात पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदावरील ४ हजार ३९८ दिवसांच्या सलग कार्यकाळाचा विक्रम मागे टाकणार आहेत. याच ऐतिहासिक विक्रमावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे.

Modi far ahead of Nehru, says Chandrakant Patil in response to Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या