विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Kadam नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. ते खोटारडे आहेत. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे,असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. तसेच असेही रामदास कदम म्हणाले. Ramdas Kadam
कदम यांनी 2009 साली निवडणुकीत विजयासाठी अघोरी पूजा केली होती, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता. भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, असे कदम म्हणालेत. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते.
शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तुम्ही येऊ नका, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त 1200 मतांनी निवडून आलेले आहेत.भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते, असाही दावा रामदास कदम यांनी केला. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडून शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
भास्कर जाधवांवर केलेल्या टीकेवर सुषमा अंधारेंनी रामदास कदमांवर टीकास्र सोडले. भास्कर जाधवांवर बोलण्याची रामदास कदम यांची लायकी नाही. डोळ्याला बाम लावून रडणाऱ्या बामदासने स्वतःच्या मुलाला मंत्रिपद मिळावे म्हणून जी वारंवार नौटंकी केली त्यांना भास्कर दादा सारख्या स्वाभिमानी नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
Bhaskar Jadhav is a liar, no one will be able to catch him in the act, Ramdas Kadam’s counterattack
महत्वाच्या बातम्या
- म्हणे औरंगजेब पवित्र व्यक्ती होता, काँग्रेसच्या माजी आमदाराची मुक्ताफळे
- सत्ताधाऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य, संदीप देशपांडे यांच्यावर हक्क भंग कारवाई होणार?
- Abu Azmi : अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड, सरकारने कडक कारवाई करावी, आनंद परांजपे यांची मागणी
- Nitesh Rane : हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत, नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना सुनावले