विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटावर नाराज असलेले आमदार भास्कर जाधव यांनी थेट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावरच तोफ डागली आहे. ठाकरे गटाच्या कार्यशैलीवरच त्यानो प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भास्कर जाधव म्हणले, जरा काही झाले तर वर जायचे, वर सुद्धा हल्ली काय उद्योग चालले आहे कळत नाही. एखादा निर्णय घेताना तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचाराले पाहिजे. तिथल्या जबाबदार नेत्याला प्रश्न विचारला पाहिजे. हा भारी वशीला हल्ली लागला आहे
वरती असलेल्या वशील्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. पक्षामध्ये कुठला नेता मला का टार्गेट करेल? का करेल, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र ठरले आहे. पक्षातील नेत्यांच्या मनात माझ्याबद्दल नितांत आदर आहे.
संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना जाधव म्हणाले की, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख मी केलेले काम. बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे 13 नेते कार्यरत होते त्यातील सुभाष देसाई आजही कार्यरत असून पूर्णक्षमतेने काम करत आहेत. ते जेव्हा मला भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतो. दिवाकर रावते यांच्यासारखा लढवय्या माणूस जेव्हा भेटतो तेव्हा ए भास्कर इकडे या असा आवाज देतात. तू चांगला बोलतोस असे म्हणत कौतुक करतात. माझा द्वेष करणार कोण? दुसरी गोष्ट माझा द्वेष कुणीही करत नाही, करत असेल तर त्याला मी किती किंमत देणार. किती द्यावी असे तुमचे म्हणणे आहे, मी काय आहे त्यांना माहिती आहे, ते काय मला माहिती आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता विनायक राऊतांवर टीका केल्याचे बोलले जात आहे.
मला पक्षातील कोणी नेता त्रास देत नाही आणि कुणी द्यायच्या भानगडीत पडू नये, हे पण सांगून टाकतो हे पूढचे बोलायला नको, असा इशाराच देत ते म्हणाले, मी घुसमटणारा माणूस नाही. शरद पवारांना सोडण्याची राजकीय चूक केली हे मी नाकारणार नाही. माझी कुणीही घुसमट केली नाही. माझी शिवसेनेत घुसमट होते असे काही नाही. माझ्याकडे प्रामाणिक म्हणून पहा.
भास्कर जाधव म्हणाले की, शरद पवारांना सोडून चूक केल्याच्या विधानावर आमच्या पक्षातील काही जण टीका करत आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावे की मी आदर्श ठेवला हे विचारात घेतले पाहिजे. मी कुठल्या पदाकरता यापूर्वीही अशी नौटंकी केली नाही, आणि करणार नाही. मी अधिवेशनावेळी सरकारला सांगितले की माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला विरोधी पक्षनेता करा. मी माझे पत्र मागे घेतो.
Angry Bhaskar Jadhav directly attacked the leadership of the Thackeray group
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी