विशेष प्रतिनिधी
नाशिक : पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली मदतीची परंपरा कायम ठेवली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनने पंजाब आणि हरियाणातील मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनासाठी मोठा हातभार लावला आहे. या व्यापाऱ्यांनी तब्बल ४० टन कांदा मोफत पाठवून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. Lasalgaon onion
लासलगाव हे देशातील सर्वात मोठे कांदा बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथे दररोज हजारो टन कांद्याची खरेदी-विक्री होते. पूरामुळे पंजाब-हरियाणामध्ये शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत, शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून सामान्य नागरिकांचे हाल हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी केवळ व्यावसायिक हिताचा विचार न करता मानवी दायित्व म्हणून ही मदत केली आहे.
कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, “पूरामुळे पीडित कुटुंबांना अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवते आहे. कांदा हा टिकणारा व आवश्यक खाद्यपदार्थ असल्यामुळे आम्ही ४० टन कांदा थेट मदतीसाठी रवाना केला. ही मदत सतत सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
हा कांदा विशेष ट्रकमधून पंजाबकडे रवाना करण्यात आली असून स्थानिक स्वयंसेवी संस्था व प्रशासनामार्फत तो पूरग्रस्त भागात पोहोचविण्यात येणार आहे.
Lasalgaon onion traders donate 40 tonnes of onions to flood victims in Punjab-Haryana
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा