MP Shrikant Shinde : एनडीए ला संख्याबळापेक्षा जास्त मतदान होईल ; खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा

MP Shrikant Shinde : एनडीए ला संख्याबळापेक्षा जास्त मतदान होईल ; खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा

MP Shrikant Shinde

विशेष प्रतिनिधी

 

मुंबई : MP Shrikant Shinde : उद्या होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची लगबग आता अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. क्रॉस वोटिंग ची शक्यता वर्तवली जात असताना. खासदार श्रीकांत शिंदे यांनी एनडीए आघाडीला तुमच्या बाळा पेक्षा जास्त मतदान होईल असा दावा केला आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे जयदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान होणार आहे. उद्या संसद भवनात सकाळी दहा ते पाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन विजयी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. उद्या रात्रीपर्यंत जवळपास दीड महिन्यानंतर देशाला उपराष्ट्रपती मिळेल. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीने पर्यत्नांची शर्यत केल्याचे पाहायला मिळत आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी दोन्ही सभागृहाचे मिळून 781 खासदार मतदानात भाग घेतील. विजयी होण्यासाठी उमेदवाराला 391 एवढ्या मताची आवश्यकता असणार आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीकर 439 एवढी संख्याबळ आहे.म्हणजेच एनडीए कडे बहुमतापेक्षा 48 जास्त मतदान आहे. तर इंडिया आघाडीकडे 324 एवढे संख्याबळ आहे. इंडिया आघाडीला आपला उमेदवार विजयी करण्यासाठी 67 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.



बिजू जनता दल, अकाली दल, बी आर एस आणि अपक्ष यांसारख्या मिळून 15 खासदारांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. इंडिया आघाडीला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान हे गुप्त पद्धतीने होते. तसेच या निवडणुकीत पक्षांना आपला व्हिप जारी करता येत नाही. त्यामुळे क्रॉस वोटिंग ची शक्यता नाकारता येत नाही. इंडिया आघाडीने आंध्र प्रदेश मधील उमेदवार देऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधील खासदारांना भूमिपुत्राला मतदान करा अशी साथ घातली आहे. त्यामुळे वाय एस आर काँग्रेस, तेलुगु देशम पार्टी आणि इतर स्थानिक पक्षाचे खासदार क्रॉस वोटिंग करून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील का? ही पहावे लागेल. इंडिया आघाडीच्या बाजूने क्रॉस वोटिंग होण्याची अपेक्षा आणि त्या दृष्टीने जुळवा जुळव केल्याचे काँग्रेसचे मत आहे.

दरम्यान इंडिया आघाडीतील शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. एनडीए च्या बाजूने क्रॉस वोटिंग होईल अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. इंडियन अतिरिक्त मतदान मिळवण्याची तयारी केली आहे असे ते म्हणाले. श्रीकांत शिंदे म्हणाले , ” उपराष्ट्रपतीपदाच्या उद्याच्या निवडणुकीचा जो नंबर आपल्याला दिसेल, त्यात एनडीएचे संख्याबळ आहे हे तर असणारच आहे त्याच्या पलीकडे जाऊन इतर पक्षातील लोकही सीपी राधाकृष्णन यांच्याबरोबर उभे राहिले हे आपल्याला पाहायला मिळतील. ”

कोणत्या पक्षाचे खासदार सीपी राधाकृष्णन यांना क्रॉस वोटिंग करतील हे आताच आपण सांगणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्या संपूर्ण पिक्चर क्लियर होईल असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खरीच क्रॉस वोटिंग होईल का ? आणि जरी क्रॉस वोटिंग झाले तरी ते इंडिया गाडीच्या बाजूने होईल की एनडीएच्या बाजूने? ही उद्या स्पष्ट होईलच. आपल्याकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर एनडीए आघाडी सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदावर विराजमान करेल की इंडिया आघाडीची कूटनीती यशस्वी होईल. हे उद्या रात्रीपर्यंत स्पष्ट होईल.

NDA will get more votes than its strength; claims MP Shrikant Shinde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023