विशेष प्रतिनिधी
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी जे बदनामीकारक वक्तव्य केले होते ते भाषण युट्यूबवर दिसून येत आहे. राहुल गांधी यांना भाषणाचा तो व्हीडिओ युट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा आदेश न्यायालयाने द्यावा, असा अर्ज सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी येथील विशेष न्यायालयात केला आहे.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे.
गांधी यांनी लंडनमध्ये जे बदनामीकारक वक्तव्य केले होते ते भाषण युट्यूबवर दिसून येत आहे. विश्रामबाग पोलिस पुणे यांनी त्या संदर्भात अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीला समन्स पाठवून तसा तांत्रिक तपास केला होता. परंतु तो तांत्रिक तपासाचा अहवाल अद्याप न्यायालयात दाखल नाही. तो अहवाल विश्रामबाग पोलिसांकडून मागवावा. तसेच राहुल गांधी यांना या न्यायालयाने आदेश द्यावेत, की तो भाषणाचा व्हीडिओ युट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा अर्ज केला आहे.
सात्यकी सावरकर यांच्या अर्जावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी हरकत घेतली आहे. खटला आता सुनावणीसाठी प्रलंबित असून या सुनावणीच्या टप्प्यावर पोलिसांकडून अहवाल मागविण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही. तसेच हा फौजदारी खटला आहे.
दिवाणी दावा नाही. त्यामुळे युट्यूबवरचा व्हीडिओ डिलीट करू नका, असे मनाई आदेश देखील देण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही. त्यामुळे सात्यकी सावरकर यांचा अर्ज चुकीचा, बेकायदेशीर व कायद्यातील तरतुदींनुसार नसून तो फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. पवार यांनी केला. अर्जावर विशेष न्यायालयात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.
Satyaki Savarkar’s application in special court seeks injunction to prevent Rahul Gandhi’s speech video from being deleted from YouTube
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा