विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :भारतीय लष्कराने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. लष्करातील कर्नल कुलदीप यादव यांनी विकसित केलेल्या ‘ऑटोमॅटिक टार्गेट क्लासिफायिंग सिस्टम’ या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीला अधिकृत पेटंट मिळाले आहे.
ही अत्याधुनिक प्रणाली रडारच्या माध्यमातून मिळणाऱ्या सिग्नल्सचे विश्लेषण करून वाहनं, विमानं किंवा मानवी हालचाली यांसारख्या विविध लक्ष्यांची स्वयंचलित ओळख आणि वर्गीकरण करते. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाची गरज नसल्यामुळे रणांगणावरील निर्णय क्षमता अधिक अचूक आणि जलद होणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे ऑपरेशनदरम्यान प्रतिसाद वेळ कमी होतो, मानवी चुका टळतात आणि परिस्थितीचे आकलन अधिक चांगले होते. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान विविध प्रकारच्या रडार प्लॅटफॉर्ममध्ये सहज समाविष्ट करता येते, त्यामुळे विविध लष्करी परिस्थितींमध्ये याचा वापर होऊ शकतो.
#IndianArmy has been successfully granted a patent for its in-house innovation — ‘Automatic Target Classifying System based on Artificial Intelligence’. This innovative solution will autonomously identify and classify targets on radar without the need for human intervention,… pic.twitter.com/lKzrLSjPHJ
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) September 10, 2025
भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्स हॅण्डलवर सांगण्यात आले की, “कर्नल कुलदीप यादव यांनी विकसित केलेले हे नवीन तंत्रज्ञान लष्कराच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेला चालना देणारे आहे.”
कर्नल यादव हे त्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि नवनवीन शोधांसाठी ओळखले जातात. जुलै 2023 मध्ये त्यांनी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अपघात प्रतिबंधक प्रणालीलाही पेटंट मिळाले होते.
Indian Army patents indigenous artificial intelligence-based ‘Automatic Target Classifying System
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा